काय करी रायनी माय? अहिराणी भाषेत माय-लेकींचा संवाद; मृणाल ठाकूरचा नवा VIDEO चर्चेत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Mrunal Thakur Video with Mother : मृणाल कितीही मोठी स्टार असली तरी किती मराठी मातीशी असलेली नाळ घट्ट आहे. मृणालचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तिच्या आईनं घरी फक्कड असा खानदेशी जेवणाचा बेत बनवला आहे.
साऊथ आणि बॉलिवूड सिनेसृष्टी गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. मृणालचा 'दो दिवाने सहर मे' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सोबत ती झळकणार आहे. हा सिनेमा 20 फेब्रुवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे. मृणाल सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. काही दिवसांआधी तिचा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अहिरणी भाषा बोलतनाचा व्हिडीओ समोर आला होता. खानदेशची मृणाल उत्तम अहिरणी बोलते हे पाहायला मिळालं. त्यानंतर मृणालचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती तिच्या आईशी अहिराणी भाषेत बोलतेय.
मृणाल कितीही मोठी स्टार असली तरी किती मराठी मातीशी असलेली नाळ घट्ट आहे. मृणालचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तिच्या आईनं घरी फक्कड असा खानदेशी जेवणाचा बेत बनवला आहे. मृणाल तिच्या आईबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. मृणाल आईबरोबर मराठी मालिका देखील पाहते.
( मुंबई-पुणे सोडून थेट उत्तराखंडात गाठलं, त्रियुगीनारायण मंदिरात विशाल-अक्षयाचा पारंपरिक विवाह, VIDEO )
advertisement
मृणाल घरी असलेली पाहून तिच्या आईने तिच्यासाठी खानदेशी जेवणाचा बेत केला. काय काय जेवण बनवलंय याची नावं ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल. मृणाल व्हिडीओमध्ये तिच्या आईशी अहिरणी भाषेत बोलताना दिसतेय. तिनं किचनमध्ये जाऊन आईला हाक मारली आणि विचारलं,काय करी रायनी माय? त्यावर तिची आई वांग्यांनं भरित म्हणत भाजलेली वांगी तिच्या हातात देते. ते पाहून मृणाल खूपच खुश होते.
advertisement
https://youtube.com/shorts/Uw7gZPlWIO4?si=06sbkIuPVnNYXHU3
मृणाल आईलाही व्हिडीओमध्ये घेते आणि विचारते, काय शे मेन्यू मग? तिची आई देखील अहिराणीमध्ये सांगते, वांग्यांनं भरीत, कांद्याची पात, बाजरीनी भाकरी, आणि मिरचीना ठेचा. एवढा सगळा मेन्यू ऐकून मृणालच्या तोंडाला पाणी सुटलं. सगळ्यांनी जेवायला या असं म्हणत ती खूप खुश झाली. माय-लेकींमधील हा गोड संवाद आणि घरगुती वातावरणाने पाहून चाहते प्रचंड खूश झालेत.
advertisement
काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये मृणालने खानदेशी जेवण खायची इच्छा व्यक्त केली होती. तिला वांग्याचं भरीत, वरण-बट्टी आणि ठेचा खायचं असल्याचं सांगितलं होतं. आता तिची ही इच्छा आईने पूर्ण केल्याचं या व्हिडीओतून दिसून येतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 4:06 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
काय करी रायनी माय? अहिराणी भाषेत माय-लेकींचा संवाद; मृणाल ठाकूरचा नवा VIDEO चर्चेत










