TRENDING:

Grapes Cleaning Tips : द्राक्ष फक्त पाण्यात टाकून धुणं पुरेसं नाही, पाहा स्वच्छ करण्याची अचूक आणि प्रभावी पद्धत

Last Updated:
How to clean grapes : आता द्राक्षांचे सीजन आहे. म्हणून बाजारात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष दिसत आहेत. मात्र अगदी टवटवीत दिसणारी ही द्राक्ष तितकीच शुद्ध आणि खाण्यायोग्य असतील असे नाही. मोठमोठी दिसणारी द्राक्षही योग्य प्रकारे स्वच्छ केली गेली नाहीत तर आपल्याला आरोग्याचे नुकसान करू शकतात. चला तर पाहूया द्राक्ष स्वच्छ करण्याची योग्य पद्धत.
advertisement
1/7
द्राक्ष फक्त पाण्यात टाकून धुणं पुरेसं नाही, पाहा स्वच्छ करण्याची अचूक पद्धत
द्राक्ष वरून जरी स्वच्छ दिसत असली तरी त्यावर कीटकनाशकांचे थर असू शकतात. हे कीटकनाशक आपल्या पोटात गेले तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच द्राक्ष व्यवथित स्वच्छ करणं आवश्यक असतं.
advertisement
2/7
कीटक आणि बुरशीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक वापरली जातात. ही रसायने द्राक्षाना सहजपणे चिकटतात आणि साध्या पाण्याने पूर्णपणे धुतली जाऊ शकत नाहीत. म्हणूनच ही द्राक्ष जर तुम्ही मुलांना देणार असाल तर ती पूर्णपणे स्वच्छ करणे महत्वाचे आहे.
advertisement
3/7
इकोन्यूजेनिक्स या वेबसाइटनुसार, द्राक्षे नेहमी थंड पाण्यात स्वच्छ करावी. द्राक्षे मोठ्या भांड्यात किंवा चाळणीत ठेवा आणि वाहत्या पाण्याखाली 20 ते 30 सेकंद धुवा. नंतर हातांनी हळूवारपणे त्यांना स्वच्छ करा. याने धूळ, घाण आणि काही पृष्ठभागावरील रसायने निघून जातात.
advertisement
4/7
पाण्यानंतर वापरा बेकिंग सोडा. द्राक्ष बेकिंग सोडा घालून स्वच्छ करणे ही एक अतिशय प्रभावी पद्धत मानली जाते. कारण ते अनेक सामान्य कीटकनाशके तोडण्यास मदत करते. एक लिटर पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि द्राक्षे 10 ते 15 मिनिटे त्यामध्ये ठेवा. नंतर द्राक्षे हलक्या हाताने स्वच्छ पाण्यात घेऊन स्वच्छ करा.
advertisement
5/7
बेकिंग सोडा नसल्यास तुम्ही व्हिनेगरदेखील वापरू शकता. व्हाईट व्हिनेगरने कीटकनाशकांसोबतच बॅक्टेरिया, बुरशी आणि जंतू देखील कमी होतात. एक भाग व्हिनेगर आणि तीन भाग पाण्याच्या द्रावणात 5 ते 10 मिनिटे द्राक्ष टाकून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. व्हिनेगरचा वास पूर्णपणे निघेपर्यंत धुवा.
advertisement
6/7
द्राक्ष वरील सर्व पद्धतीने स्वच्छ केल्यानंतर ती कोरडी करणदेखील तितकंच आवश्यक आहे. स्वच्छ कापडाने किंवा किचन टॉवेलने द्राक्ष हळुवारपणे पुसून स्वच्छ करा. अथवा हवेमध्ये सुकू द्या. व्यवस्थित सुकवलेली द्राक्ष फ्रिजमध्ये जास्त काळ ताजी राहतात.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Grapes Cleaning Tips : द्राक्ष फक्त पाण्यात टाकून धुणं पुरेसं नाही, पाहा स्वच्छ करण्याची अचूक आणि प्रभावी पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल