TRENDING:

Rinku Rajguru : 'मी केलेल्या प्रेमावर माझा विश्वास होता पण...' मग कुठे बिनसलं, रिंकूने अखेर सगळं सांगितलं

Last Updated:
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरू पहिल्यांदाच तिच्या प्रेमाबद्दल बोलली. तिचा तिच्या प्रेमावर खूप विश्वास होता मग नेमकं कुठे बिनसलं?
advertisement
1/7
'मी केलेल्या प्रेमावर माझा विश्वास होता पण...' मग रिंकू राजगुरूचं कुठे बिनसलं?
अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या लव्ह लाईफची मागील अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चा सुरू आहे. एका मुलाखतीत रिंकूनं मला बॉयफ्रेंड नको नवरा पाहिजे असं म्हटलं. त्यानंतर आता एका नव्या मुलाखतीत रिंकूनं तिच्या ब्रेकअपविषयी सांगितलं. तिचा तिनं केलेल्या प्रेमावर विश्वास होता पण असं काय झालं? कुठे बिनसलं? या सगळ्याबद्दल सांगितलं. 
advertisement
2/7
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रिंकू म्हणाली, "मी जर कुणावर प्रचंड प्रेम करत असेल तर मी सगळं सहन करते, जे काही असेल ते. सगळ्या गोष्टी मिटवण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेणारी मी मुलगी आहे. एका पॉइंटला तुम्हाला ते रिअलाइज होतं की, समोरचा जाणून बुजून तुम्हाला डिचवण्यासाठी करतोय हे कळतं. तुम्हाला ग्रॅटेंट घेतलं जातंय, कुठेतरी हलक्यात घेतलं जातंय, कुठे जाणार आहे, काय करणार आहे?"
advertisement
3/7
"ते नातं टिकून राहावं म्हणून मी भांडते कारण मला माणसं गमवण्याची खूप भीती आहे. मला असं वाटतं की एकदा जीव लावला की ते आपलं आहे. मग आपलं कसं गमावू, आपलं जसं असेल तर असेल."
advertisement
4/7
"पण सेल्फ रिस्पेक्टला धक्का लागायला लागला की मी एका पॉइंटला शांत होते. मी त्या माणसांमध्ये, नात्यांमध्ये थकले की मी शांत होऊन जाते. मी प्रचंड रडते, स्वत:ला प्रचंड त्रास करून घेते. त्यानंतर त्या माणसांसोबत मी पुन्हा राहू शकत नाही, तिथे पुन्हा जाऊ शकत नाही."
advertisement
5/7
रिंकू पुढे म्हणाली, "अशी माणसं माझ्या आयुष्यात एकदाच आलीत. तेव्हाच मला कळलं की मी एक्सट्रिम आहे, प्रचंड सेन्सेटिव्ह आहे मला ग्रँन्टेड घेणं, हलक्यात घेणं आवडत नाही. कोणाच्या फिलिंग्ससोबत खेळलं की मला प्रचंड वाईट वाटतं. त्यामुळे मी खूप शांत होते. उद्या तो येऊन मला म्हणाला की, हत्ती उडाला तर मी म्हणेन हो उडाला."
advertisement
6/7
"अशा माणसांसोबत मी पुन्हा काम करणार नाही. मला माझ्यापेक्षा ते महत्त्वाचे नाहीत. मला वाईट वागता येत नाही. मी शांत राहिन, मी डिस्टन्स मेनेंट करेन. मी चार चौघात प्रेमानं बोलेन, मी मदतही करेन. पण मी पुन्हा तिथे जाणार नाही. पुढच्या त्रास होणार नाही म्हणून मी लांबून मदत करेन. कारण एकेकाळी आपण जीव लावलेला असतो. मी केलेल्या प्रेमावर माझा विश्वास होता आणि आहे पण समोरचा तसा होता तर आपण काय करणार."
advertisement
7/7
रिंकू शेवटी म्हणाली, "आपल्याला इतका त्रास होतोय तर तो आपण दुसऱ्याला द्यायला नको. त्याचा स्वभाव आहे तर तो तसा वागला. आपण तसे नाही आहोत तर आपण का तसं वागावं. पुढच्याने केलंय म्हणून आपण नाही करायचं."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : 'मी केलेल्या प्रेमावर माझा विश्वास होता पण...' मग कुठे बिनसलं, रिंकूने अखेर सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल