TRENDING:

'Thar, Mahindra 700 आणि Ertiga उभी आहे म्हणून रेंटने द्या', पठ्याने केला 2 कोटींचा स्कॅम, 32 गाड्या जप्त

Last Updated:

यामध्ये आणखी वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे. याआधीही त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात त्याचे किती साथीदार आहे, याचा तपास घेतला जात आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : सध्या सोशल मीडियावर बिझनेस करण्यासाठी हजारो लोक आयडिया देण्यासाठी तयार असतात, अशाच एका बिझनेस आयडियाच्या नावाखाखी २ कोटींचा घोटाळा समोर आला आहे. कार भाड्याने लावण्याचं आमिष देऊन लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड आालाा आहे. या घोटाळेबाजाकडे तब्बल 32 कार जप्त करण्यात आल्या आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील गुन्हे शाखेच्या ५ टीमने वाहन फसवणुकीचा प्रकार उघड केला आहे. संदीप रघुश शेट्टी असं फसवणूक करणाऱ्या भामट्याचं नाव आहे. या संदीप शेट्टीकडून तब्बल ३२ कार जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल २ कोटी ४४ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

कार भाड्याने द्या अन् पैसे कमवा'

advertisement

संदीप रघु शेट्टी (वय ३८) हा उलवे, नवी मुंबई इथं राहणार आहे. वाघळे स्टेट पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या गट ५ने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. संदीप शेट्टी हा उलवे इथं राहत होता. संदीप शेट्टी हा न्यायालयीन कोठडीत आहे. याआधी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे. हा तक्रारदारांची वाहनं घ्यायचा, गाडी उभीच आहे तर भाड्याने द्या, त्याचं रेंट तुम्हाला मिळेल, अशी ऑफर द्यायचाा. त्यानंतर मोठ्या हुशारीने तो कारमालकाकडून सगळी कागदपत्र घ्यायचा. गाड्या रेंटने द्यायचा किंवा गाड्या विकून टाकायचा. यामध्ये प्रायव्हेट वाहनं आहे आणि टुरिस्ट वाहनं सुद्धा आहे, अशी त्याची पद्धत होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

advertisement

तसंच, या प्रकरणामध्ये त्याच्याकडून  तब्बल ३२ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. नवी मुंबई, लोणावळा, पुणे आळेफाटा, कल्याण, पनवेल अशा अनेक भागातून जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे रु. २ कोटी ४४ लाख १५ हजार इतकी आहे.यामध्ये आणखी वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे. याआधीही त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात त्याचे किती साथीदार आहे, याचा तपास घेतला जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मन होईल तृप्त, फक्त 40 रुपयांत खा चविष्ट खिचा पापड, मुंबईत हे आहे ठिकाण
सर्व पहा

आरोपीने वाहनमालकांकडून जास्त भाड्याचे आमिष दाखवून वाहने ताब्यात घेऊन ती परस्पर इतरांकडे गहाण ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे केली असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी वाहन भाड्याने देताना योग्य करार व पडताळणी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
'Thar, Mahindra 700 आणि Ertiga उभी आहे म्हणून रेंटने द्या', पठ्याने केला 2 कोटींचा स्कॅम, 32 गाड्या जप्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल