राजस्थानमध्ये गुपचूप लग्न, हैदराबादमध्ये ग्रँड रिसेप्शन! रश्मिका-विजयच्या लग्नाची पत्रिका लीक, खरी तारीख आली समोर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rashmika Mandanna-Vijay Deverkonda Wedding: गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत रंगली होती, त्या रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.
advertisement
1/9

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून ज्या जोडीच्या लग्नाची चर्चा दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत रंगली होती, त्या रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.
advertisement
2/9
'आम्ही फक्त मित्र आहोत' असं म्हणणाऱ्या या जोडीच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर लीक झाली असून, अवघ्या १० दिवसांत ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
3/9
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्रिकेनुसार, रश्मिका आणि विजय येत्या २६ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. पत्रिकेतील मजकूर अत्यंत भावूक आहे.
advertisement
4/9
त्यात लिहिलंय, "आमच्या कुटुंबाच्या आशीर्वादाने, रश्मिका आणि मी एका अत्यंत खाजगी समारंभात २६ फेब्रुवारीला लग्न करत आहोत. आमच्या या नवीन प्रवासाची सुरुवात करताना, आमच्या प्रवासाचा भाग असलेल्या तुमच्या सर्वांची उपस्थिती आणि आशीर्वाद आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत."
advertisement
5/9
मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न राजस्थानमधील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडणार आहे. बॉलिवूडमधील अनेक बिग फॅट वेडिंगप्रमाणेच रश्मिका आणि विजयनेही राजस्थानच्या राजेशाही थाटाची निवड केली आहे. हे लग्न अत्यंत खाजगी असेल, ज्यात फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.
advertisement
6/9
राजस्थानमध्ये लग्न आटोपल्यानंतर ही जोडी सिनेसृष्टीतील आपल्या मित्रमंडळींसाठी आणि मीडियासाठी एका भव्य रिसेप्शनचं आयोजन करणार आहे.
advertisement
7/9
४ मार्च २०२६ रोजी हैदराबादमधील बंजारा हिल्स येथील 'ताज कृष्णा' या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा रिसेप्शन सोहळा पार पडेल. व्हायरल झालेली ही पत्रिका प्रामुख्याने मीडिया आणि पापाराझी लोकांसाठी पाठवण्यात आल्याचं समजतंय.
advertisement
8/9
लग्नाच्या धावपळीतही हे दोन्ही कलाकार आपल्या कामात व्यग्र आहेत. रश्मिका सध्या तिच्या आगामी 'AA22xA6' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदाच खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
9/9
दुसरीकडे, विजय देवरकोंडा त्याच्या 'रणबाली' (VD14) चित्रपटाच्या कामात गुंतला असून हा चित्रपट सप्टेंबर २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राजस्थानमध्ये गुपचूप लग्न, हैदराबादमध्ये ग्रँड रिसेप्शन! रश्मिका-विजयच्या लग्नाची पत्रिका लीक, खरी तारीख आली समोर