अपूर्वा नेमळेकरच नाही या मराठी अभिनेत्रींनीही डिवोर्सनंतर थाटला दुसरा संसार, एकीनं नवऱ्यासोबत गाजवलं बॉलिवूड
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actresses Second Marriage : फक्त अपूर्वा नेमळेकरच नाही तर मराठीतील अशा अभिनेत्री ज्यांनी डिवोर्सनंतर न खचता आपलं नवं आयुष्य सुरू केलं. दुसरं लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली. कोण आहेत त्या मराठी अभिनेत्री?
advertisement
1/10

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं नुकतंच दुसरं लग्न केलं. अपूर्वाचं पहिलं लग्न झालं होतं मात्र त्या लग्नात तिची फसवणूक झाली.
advertisement
2/10
डिवोर्सच्या जवळपास 8 वर्षांनी अपूर्वानं तिच्या प्रेमाला दुसरा चान्स देत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. तनुज गोवळकर असं अपूर्वाच्या दुसऱ्या नवऱ्याचं नाव आहे.
advertisement
3/10
डिवोर्सनंतर दुसरं लग्न करणारी अपूर्वाही पहिलीच मराठी अभिनेत्री नाही. मराठी इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचा पहिला संसार मोडल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली.
advertisement
4/10
सोनाली कुलकर्णी हिचं देखील नचिकेत पटवैद्य यांच्याबरोबर दुसरं लग्न आहे. सोनालीचं पहिलं लग्न दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर झालं होतं.
advertisement
5/10
अभिज्ञा भावे हिचं पहिलं लग्न वरुण वैतिकरबरोबर झालं होतं. काही कारणांनी त्यांचा डिवोर्स झाला. डिवोर्सनंतर अभिज्ञाने मेहुल पैबरोबर दुसरं लग्न केलं.
advertisement
6/10
संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिचा देखील डिवोर्स झाला आहे. तिचं पहिलं लग्न संगीतकार आनंद ओकबरोबर झालं होतं. काही महिन्यांआधीच शुभांगीनं सुमित म्हशेळकरबरोबर दुसरं लग्न केलं.
advertisement
7/10
अभिनेत्री रेणुका शहाणे या अभिनेते आशुतोष राणा यांच्या पत्नी आहेत. पण आशुतोष राणांबरोबर लग्न करण्याआधी त्यांचं लग्न प्रसिद्ध मराठी अभिनेते, लेखक विजय केंकरे यांच्याबरोबर झालं होतं. पण त्यांचा डिवोर्स झाला.
advertisement
8/10
अभिनेत्री मेघा धाडेचं पहिलं लग्न फार कमी वयात झालं होतं. तिला पहिल्या लग्नातून एक मुलगी आहे. तिचं दुसरं लग्न आदित्य पावसकरबरोबर झालं.
advertisement
9/10
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचं पहिलं लग्न अमेय निपाणकरबरोबर झालं होतं. पण त्यांचा संसार फारकाळ टिकला नाही. डिवोर्सनंतर शर्मिष्ठानं तेजस देसाईबरोबर लग्न केलं. आता दोघांना एक मुलगी आहे.
advertisement
10/10
अभिनेत्री स्नेहा चव्हाणचं पहिलं लग्न अभिनेता अनिकेत विश्वासरावबरोबर झालं होतं. तिने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबीयांवर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप केले होते. डिवोर्सनंतर स्नेहाने मानसबरोबर दुसरं लग्न केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अपूर्वा नेमळेकरच नाही या मराठी अभिनेत्रींनीही डिवोर्सनंतर थाटला दुसरा संसार, एकीनं नवऱ्यासोबत गाजवलं बॉलिवूड