TRENDING:

धाराशिवमध्ये राणा पाटलांचा 'मास्टरस्ट्रोक'; शिवसेना आणि ठाकरे गटाला एकाच वेळी मोठा धक्का

Last Updated:

शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटात अस्वस्थता पसरली असून स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या जोरदार राजकीय हालचालींमध्ये आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मोठी खेळी करत शिवसेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. परंडा व उमरगा तालुक्यातील दोन अपक्ष जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या गोटात घेण्यात राणा पाटील यांना यश आले आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत.
News18
News18
advertisement

परंडा तालुक्यातील लोणी गटातून निवडून आलेल्या उद्धव ठाकरे गट समर्थक अपक्ष उमेदवार राणी रेवणाथ ढोरे तसेच माजी आमदार ज्ञानराज चौगुले समर्थक शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आणि आलूर गटाचे आप्पासाहेब मल्लिनाथ पाटील हे दोघेही आता भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या गटात दाखल झाले आहेत. या घडामोडीमुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटात अस्वस्थता पसरली असून स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement

राणा पाटील यांनी टाकलेली ही चाल निर्णायक ठरण्याची शक्यता

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी दोन्ही बाजूंनी सदस्यांची पळवा-पळवी सुरू असून विविध गटांकडून आमदार आणि प्रमुख नेत्यांचे फोन, भेटीगाठी आणि राजकीय डावपेच सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राणा पाटील यांनी टाकलेली ही चाल निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकीय हालचालींना वेग

advertisement

दरम्यान, भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांना फोटो आणि व्हिडिओ पाठवून या घडामोडींची माहिती दिली. सध्या सहलीवर गेलेल्या भाजप समर्थक उमेदवारांचा कोकणातील मुक्काम कर्नाटकात हलविण्यात आल्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमधून राजकीय हालचालींना वेग आल्याचे स्पष्ट दिसत असून, कोणत्याही दबावाखाली न येता सदस्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

advertisement

राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग 

जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा संघर्ष अधिकच तीव्र होत असून येत्या काही तासांत आणखी उलथापालथी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग देण्यात आला असून धाराशिव जिल्ह्याचे राजकारण सध्या अत्यंत चुरशीच्या टप्प्यावर पोहोचले आहे. सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

हे ही वाचा:

VIDEO: बारामतीत अजितदादांचा पुतळा उभारला जाणार, ठिकाण कुठे अन् कशी असेल संरचना? पाहा पहिली झलक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मन होईल तृप्त, फक्त 40 रुपयांत खा चविष्ट खिचा पापड, मुंबईत हे आहे ठिकाण
सर्व पहा

दादांच्या निधनाच्या काही तासांतच मंत्रालयात सूत्र फिरली, अधिकारी कामाले लागले, त्या ७५ फाईलींवर सह्या कुणाच्या आदेशाने?

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धाराशिवमध्ये राणा पाटलांचा 'मास्टरस्ट्रोक'; शिवसेना आणि ठाकरे गटाला एकाच वेळी मोठा धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल