अरे देवा! नवीन वर्ष सुरू होताच या राशींची शनिदेव घेणार परीक्षा, मोठी संकटं येणार, आर्थिक नुकसान होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीदेवांना कर्माचा हिशोब ठेवणारा आणि न्याय देणारा ग्रह मानले जाते. व्यक्तीच्या आयुष्यातील चढ-उतार, संघर्ष, संयम आणि शिस्त यांच्याशी शनीचा थेट संबंध असतो.
advertisement
1/6

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीदेवांना कर्माचा हिशोब ठेवणारा आणि न्याय देणारा ग्रह मानले जाते. व्यक्तीच्या आयुष्यातील चढ-उतार, संघर्ष, संयम आणि शिस्त यांच्याशी शनीचा थेट संबंध असतो. सध्या शनी मीन राशीत स्थित असून त्यामुळे काही राशींवर साडेसातीचा प्रभाव सुरू आहे. आगामी 2026 वर्षात शनी मीन राशीतच वक्री होणार असल्याने त्याचे परिणाम अधिक ठळकपणे जाणवतील. विशेष म्हणजे, या काळात दोन राशींवर शनिची ढैय्या कायम राहणार असून त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता ज्योतिषांनी व्यक्त केली आहे.
advertisement
2/6
ज्योतिषीय गणनांनुसार 2026 मध्ये सिंह आणि धनु या दोन राशींवर शनिची ढैय्या प्रभावी राहील. ढैय्याचा काळ हा साडेसातीइतका तीव्र नसला, तरी मानसिक ताण, विलंब, अडथळे आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ करणारा मानला जातो. पुढील वर्षात शनी वक्री, मार्गी होणे तसेच शनीचा उदय या महत्त्वाच्या घडामोडी घडणार असल्याने काही राशींसाठी हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले ठरू शकते.
advertisement
3/6
सिंह रास 2026 मध्ये सिंह राशीच्या लोकांवर शनिची ढैय्या असल्याने सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. या काळात प्रगती संथ गतीने होईल. नोकरी किंवा व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील, मात्र त्याचे अपेक्षित फळ लगेच मिळेलच असे नाही. प्रमोशन किंवा नवीन संधींमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे वेळेत पूर्ण न झाल्याने मानसिक अस्वस्थता वाढू शकते.
advertisement
4/6
आर्थिक बाबतीत खर्च अचानक वाढण्याची चिन्हे आहेत. उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखण्यासाठी काटकसरीची गरज भासेल. गुंतवणूक करताना घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ संवेदनशील राहील. थकवा, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. तसेच, गैरसमज, वाद किंवा चुकीच्या आरोपांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे संयम, शांतता आणि स्पष्ट संवाद यावर भर देणे लाभदायक ठरेल.
advertisement
5/6
धनु रास धनु राशीच्या लोकांसाठी 2026 मधील शनिची ढैय्या अधिक आव्हानात्मक ठरू शकते. या काळात निर्णयक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मनात संभ्रम निर्माण होईल आणि योग्य-अयोग्याचा विचार करताना गोंधळ उडू शकतो. कामातील शिस्त कमी झाल्यामुळे हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत, याचा परिणाम प्रतिष्ठेवरही होऊ शकतो.
advertisement
6/6
महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे तसेच कुटुंबातील अनुभवी व्यक्तींचे मत विचारात घेणे फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थितीत चढ-उतार जाणवतील. उत्पन्नात स्थैर्य येण्यासाठी मेहनत आणि संयम आवश्यक राहील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सांधेदुखी, पाठदुखी किंवा सततचा थकवा जाणवू शकतो. कामाचा ताण आणि मानसिक दबाव यामुळे ऊर्जा कमी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अरे देवा! नवीन वर्ष सुरू होताच या राशींची शनिदेव घेणार परीक्षा, मोठी संकटं येणार, आर्थिक नुकसान होणार