TRENDING:

Shani Astro 2026: त्रासात किती दिवस काढले, शनिची अडीचकी सोसणाऱ्यांचा आता 2026 मध्ये गोल्डन काळ

Last Updated:
Shani Astrology: शनिच्या अडीचकीच्या काळात कर्मफळ दाता शनिदेव लोकांची परीक्षा घेतात. जो या परीक्षेत यशस्वी होतो, त्याला शनिदेव जाता जाता अत्यंत शुभ फळ देऊन जातात. त्यामुळे शनिच्या अडीचकीच्या काळात घाबरून न जाता आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते.
advertisement
1/5
त्रासात किती दिवस काढले, शनिची अडीचकी सोसणाऱ्यांचा आता 2026 मध्ये गोल्डन काळ
जर तुमच्या कुंडलीत शनि मजबूत स्थितीत असेल, तर ही अडीचकी शुभ फळ देखील देऊ शकते. सध्या सिंह आणि धनु या दोन राशींवर शनिची अडीचकी सुरू आहे.
advertisement
2/5
सिंह राशीला शनिच्या अडीचकीपासून मुक्ती कधी मिळणार?सिंह राशीच्या लोकांना 3 जून 2027 रोजी शनिच्या अडीचकीपासून तात्पुरती मुक्ती मिळेल. मात्र, 20 ऑक्टोबर 2027 पासून ही राशी पुन्हा शनिच्या अडीचकीच्या प्रभावाखाली येईल आणि ही स्थिती 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत कायम राहील. याचा अर्थ असा की, सिंह राशीला शनिच्या अडीचकीपासून पूर्णपणे मुक्ती 23 फेब्रुवारी 2028 रोजीच मिळणार आहे.
advertisement
3/5
धनु राशीला शनिच्या अडीचकीपासून मुक्ती कधी मिळणार?सिंह राशीप्रमाणेच धनु राशीच्या लोकांनाही 23 फेब्रुवारी 2028 रोजी शनिच्या अडीचकीतून पूर्णपणे मुक्ती मिळेल. तोपर्यंत या राशीच्या लोकांनी प्रत्येक कामात अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
advertisement
4/5
सिंह आणि धनु राशीचा सुवर्णकाळ कधी सुरू होणार?23 फेब्रुवारी 2028 पासून सिंह आणि धनु या दोन्ही राशींचा सुवर्णकाळ सुरू होईल. शनिच्या अडीचकीमुळे तुमची जी कामे रखडली होती, ती पूर्ण होऊ लागतील. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल आणि व्यवसायात जबरदस्त प्रगती पाहायला मिळेल. या काळात संपत्तीत वाढ होईल आणि तुमची स्वप्ने पूर्ण होऊ लागतील.
advertisement
5/5
शनिच्या अडीचकीच्या काळात करायचे प्रभावी उपाय -या काळात शनिदेवाचा प्रकोप कमी करण्यासाठी आणि शुभ फळ मिळवण्यासाठी काही उपाय करावे. प्रत्येक शनिवारी गरीब किंवा गरजू लोकांना दान करा. नियमितपणे शनि चालिसाचे पठण करा. हनुमानाची पूजा-उपासना करा आणि हनुमान चालीसा वाचा. दररोज किंवा शनिवारी शिवलिंगावर जल अर्पण करा. गरजू आणि असहाय्य लोकांना शक्य ती मदत करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shani Astro 2026: त्रासात किती दिवस काढले, शनिची अडीचकी सोसणाऱ्यांचा आता 2026 मध्ये गोल्डन काळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल