TRENDING:

कुत्र्याचा चावा, म्हशीचा मृत्यू आणि ते गाव जेवण, आता 200 गावकरी रेबीजच्या रडारवर; नक्की असं काय घडलं?

Last Updated:

एका पाळीव जनावराचा मृत्यू आणि त्यातून निर्माण झालेली रेबीजची (Rabies) भीती, यामुळं सध्या परिसरात दहशतीचं वातावरण आहे. नेमकं काय घडलं आणि गावकऱ्यांनी 'अँटी-रेबीज' लस घेण्यासाठी का गर्दी केली, हे जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्यात किंवा तेरवीसारख्या धार्मिक विधीत संपूर्ण गावाला जेवणाचे आमंत्रण देण्याची जुनी परंपरा आहे. अशा कार्यक्रमात संपूर्ण गावातल्यांसाठी जेवण तयार केलं जातं. परंतू अशाच एक कार्यक्रमात जेवल्यामुळे एका गावातील जवळ-जवळ 200 लोकांचा जीव धोक्यात आला आहे. आता का घडलं कसं घडलं असा प्रश्न तु्म्हालाही पडलाच असेल? चला सविस्तर जाणून घेऊ.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

एका पाळीव जनावराचा मृत्यू आणि त्यातून निर्माण झालेली रेबीजची (Rabies) भीती, यामुळं सध्या परिसरात दहशतीचं वातावरण आहे. नेमकं काय घडलं आणि गावकऱ्यांनी 'अँटी-रेबीज' लस घेण्यासाठी का गर्दी केली, हे जाणून घेऊया.

उत्तर प्रदेशातील उझानी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिपरौल गावात 23 डिसेंबर 2025 रोजी एका तेरवीचा कार्यक्रम होता. परंपरेनुसार गावाला जेवण देण्यात आले, ज्यामध्ये रायताही (कोशिंबीर) होता. सर्वांनी आनंदाने जेवणाचा आस्वाद घेतला. मात्र, खरी खळबळ उडाली ती 26 डिसेंबरला, जेव्हा त्या घरची म्हैस दगावली. चौकशीअंती समजले की, ज्या म्हशीच्या दुधापासून तो रायता बनवला होता, त्या म्हशीला काही दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे या म्हशीचा मृत्यू रेबीजच्या लक्षणांमुळेच झाल्याचे स्पष्ट होताच संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले.

advertisement

म्हैस वेडी होऊन मेली, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ज्यांनी ज्यांनी जेवणात रायता खाल्ला होता, त्या सर्वांचे धाबे दणाणले. "आपल्यालाही रेबीज होईल का?" या भीतीने शनिवारी सकाळीच पुरुष, महिला आणि तरुणांनी सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) धाव घेतली.

गावातील जशोदा आणि कौशल कुमार या गावकऱ्यांनी सांगितले की, "आम्हाला माहिती नव्हतं की म्हशीला कुत्र्याने चावलं होतं. पण ती मेल्यानंतर आम्हाला धोका वाटू लागला, म्हणून आम्ही खबरदारी म्हणून इंजेक्शन घ्यायला आलो आहोत."

advertisement

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर मिश्रा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सांगितले की, "म्हैस रेबीजच्या लक्षणांमुळे दगावली असल्याची माहिती आम्हाला मिळाली. गावकऱ्यांनी त्या म्हशीच्या दुधाचा रायता खाल्ला असल्याने त्यांच्या मनात शंका होती. 'प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर' (प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला) या न्यायाने आम्ही सर्वांना लस घेण्याचा सल्ला दिला."

advertisement

तज्ज्ञांच्या मते, दूध उकळल्यानंतर रेबीजचा विषाणू जिवंत राहण्याची शक्यता कमी असते, तरीही लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी लसीकरण करणे आवश्यक होते. सध्या गावातील परिस्थिती सामान्य असून आरोग्य विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

रेबीजबाबत ही खबरदारी घ्या (महत्त्वाच्या टिप्स):

जर तुमच्या पाळीव जनावराला (गाय, म्हैस, कुत्रा) पिसाळलेला कुत्रा चावला असेल, तर त्याचे दूध वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

advertisement

जनावरांमध्ये लाळ गळणे, वेड्यासारखे वागणे किंवा पाणी पिण्यास नकार देणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
31 डिसेंबरला एकादशी; मटण, चिकन खावं की नाही? खाल्ल्यास काय होतं? Video
सर्व पहा

शंका असल्यास 'अँटी-रेबीज' लस घेण्यास उशीर करू नका.

मराठी बातम्या/Viral/
कुत्र्याचा चावा, म्हशीचा मृत्यू आणि ते गाव जेवण, आता 200 गावकरी रेबीजच्या रडारवर; नक्की असं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल