TRENDING:

व्हॅलेंटाईन वीकमध्ये शुक्र बदलणार नक्षत्र, 'या' 4 राशींच्या लव्ह लाइफमध्ये येणार गोडवा; वाढणार रोमांस

Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र हा प्रेम, सौंदर्य आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू असतानाच शुक्र ग्रहाची चाल बदलणार आहे.
advertisement
1/6
व्हॅलेंटाईन वीकमध्ये शुक्र बदलणार नक्षत्र, 'या' 4 राशींच्या नात्यात येणार गोडवा
ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र हा प्रेम, सौंदर्य आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू असतानाच शुक्र ग्रहाची चाल बदलणार आहे. बुधवार, 11 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह राहुच्या मालकीच्या 'शतभिषा' नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
advertisement
2/6
शुक्राचा हा नक्षत्र बदल प्रेमसंबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. राहु आणि शुक्र यांच्यात मैत्रीचा भाव असल्याने, या नक्षत्रातील शुक्राचे भ्रमण अनेक राशींच्या लव्ह लाईफमध्ये रोमान्सची उधळण करणारे ठरेल. विशेषतः 4 राशींसाठी हा काळ 'व्हॅलेंटाईन गिफ्ट'पेक्षा कमी नसेल.
advertisement
3/6
वृषभ - नात्यात येईल स्थिरता: वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. 11 फेब्रुवारीपासून तुमच्या लव्ह लाईफमध्ये सकारात्मक बदल घडतील. जोडीदारासोबत सुरू असलेले जुने वाद मिटतील. जर तुम्ही कोणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी यशदायी ठरेल.
advertisement
4/6
सिंह - रोमान्सची उधळण: सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप उत्साही असेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एखादी सरप्राईज भेट मिळण्याची शक्यता आहे. व्हॅलेंटाईन वीकच्या उर्वरित दिवसांत तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एखादी छोटी ट्रिप प्लॅन करू शकता, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल.
advertisement
5/6
तूळ - नवी सुरुवात: तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्याने हा नक्षत्र बदल तुमच्यासाठी 'लकी' ठरेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या संवादात स्पष्टता येईल. जे लोक नवीन नात्याच्या शोधात आहेत, त्यांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीची एन्ट्री होऊ शकते. सामाजिक वर्तुळात तुमचे आकर्षण वाढेल.
advertisement
6/6
मकर - जोडीदाराची साथ: मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे भ्रमण कौटुंबिक आणि प्रेम सुख वाढवणारे आहे. तुमच्या कठीण काळात जोडीदार खंबीरपणे पाठीशी उभा राहील. तुमच्यातील एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल आणि तुम्ही भविष्यातील योजनांवर एकत्र काम कराल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
व्हॅलेंटाईन वीकमध्ये शुक्र बदलणार नक्षत्र, 'या' 4 राशींच्या लव्ह लाइफमध्ये येणार गोडवा; वाढणार रोमांस
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल