TRENDING:

Shukra Gochar 2026: शुक्र कुंभ राशीत! मिथुन, सिंहसहित 5 राशींना सोन्याचे दिवस पुन्हा येणार, नवं काही हातात

Last Updated:
Venus Transit In Aquarius 2026: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष स्थान आहे. या ग्रहाला थेट पैसेवाला ग्रह म्हटले जाते. शुक्र ग्रह 6 फेब्रुवारीला कुंभ राशीत गेला आहे. तिथं आधीच बुध आणि राहु बसलेले असल्यामुळे आता शुक्र, बुध आणि राहुची युती झाली आहे. शुक्र हा सुख, प्रेम आणि पैशांचा कारक मानला जातो. या गोचरमुळे मिथुन आणि सिंहसह 5 राशींना नशिबाची जोरदार साथ मिळणार आहे.
advertisement
1/5
शुक्र कुंभ राशीत! मिथुन, सिंहसहित 5 राशींना सोन्याचे दिवस पुन्हा, नवं काही हातात
मिथुन - शुक्र तुमच्या राशीच्या 9 व्या घरात आला आहे. यामुळे तुम्हाला फिरायला जाण्याची किंवा परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळेल. जर तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल, तर घरच्यांचा पाठिंबा मिळेल. धार्मिक कामात तुमचं मन रमेल आणि तिथे थोडा खर्चही होईल. भावंडांची मदत मिळेल आणि तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील.
advertisement
2/5
सिंह - शुक्र तुमच्या 7 व्या घरात आल्यामुळे लग्न आणि बिझनेस पार्टनरशिपसाठी हा काळ चांगला आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि तुम्ही मिळून एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. व्यापारात प्रगती होईल आणि तुमचं व्यक्तिमत्व आधीपेक्षा जास्त आकर्षक वाटू लागेल.
advertisement
3/5
तूळ - शुक्र तुमच्या 5 व्या घरात गेल्याने शिक्षण आणि प्रेमसंबंधांसाठी हा काळ भारी आहे. जे विद्यार्थी कलेशी संबंधित आहेत, त्यांना नवीन आणि भन्नाट आयडिया सुचतील. परदेशात शिकायला जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. लव्ह लाईफमध्ये रोमान्स वाढेल आणि नातं घट्ट होईल.
advertisement
4/5
मकर - शुक्र तुमच्या 2 व्या घरात म्हणजे धन स्थानी गेला आहे. तुमची बोलण्याची पद्धत खूप प्रेमळ होईल, ज्यामुळे तुमचं कौतुक होईल. तुमची कमाई वाढेल आणि बँक बॅलन्स सुद्धा सुधारेल. जे लोक पैशांच्या अडचणीत होते, त्यांना आता दिलासा मिळेल आणि आर्थिक परिस्थिती हाताळता येईल.
advertisement
5/5
मीन - शुक्र तुमच्या 12 व्या घरात गेल्यामुळे तुमचे फालतू खर्च कमी होतील. विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल आणि जे लोक लग्नासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचं काम जमून येईल. जर तुम्ही मुलाचं प्लॅनिंग करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. जुन्या वादांतून तुमची सुटका होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Shukra Gochar 2026: शुक्र कुंभ राशीत! मिथुन, सिंहसहित 5 राशींना सोन्याचे दिवस पुन्हा येणार, नवं काही हातात
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल