TRENDING:

Surya Grahan 2026: ग्रहण संपलं तरी या राशींवर काळी छाया 15 दिवस राहणार; भलत्याच अडचणींचा त्रास

Last Updated:
Surya Grahan 2026: वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी होऊन गेलं. दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी सुरू झालेलं हे ग्रहण संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी संपलं. ग्रहण जरी संपलं असलं तरी त्याचा प्रभाव अजूनही पूर्णपणे ओसरलेला नाही. ज्योतिषशास्त्रातील जाणकारांच्या मते, सूर्यग्रहणाचा प्रभाव साधारणपणे एक महिनाभर जाणवतो ग्रहणाच्या 15 दिवस आधी आणि 15 दिवस नंतर.
advertisement
1/6
ग्रहण संपलं तरी या राशींवर काळी छाया 15 दिवस राहणार; भलत्याच अडचणींचा त्रास
यानुसार, 17 फेब्रुवारीच्या ग्रहणाचा परिणाम 4 मार्च 2026 पर्यंत राहू शकतो. विशेष म्हणजे याच दिवशी होळीचा सण आहे आणि त्याच वेळी या ग्रहणाचे सावट पूर्णपणे दूर होईल. तोपर्यंत 5 राशींच्या व्यक्तींनी विशेष सावध राहण्याची गरज आहे.
advertisement
2/6
सिंह - सूर्यग्रहणाचा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. येणारे 15 दिवस तुम्हाला अत्यंत सतर्क राहून काम करावं लागेल. तुमच्या आत्मविश्वासात थोडी घट होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. घाईघाईत घेतलेले निर्णय किंवा अहंकार तुम्हाला अडचणीत टाकू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने विनाकारण वाद टाळणेच हिताचे ठरेल.
advertisement
3/6
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण काही संकटे घेऊन येऊ शकतं. नोकरी, व्यवसाय किंवा इतर कामांमध्ये अडचणी येतील. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता असून अनावश्यक खर्च किंवा चुकीची गुंतवणूक वाढू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपघात किंवा दुखापत होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. इतरांचे वाहन मागून चालवणे सध्या टाळलेलेच बरे.
advertisement
4/6
वृश्चिक - तुमच्यासाठी सुद्धा पुढचे 15 दिवस कठीण जाऊ शकतात. गुंतवणूक किंवा खर्चाच्या बाबतीत नुकसान सहन करावं लागेल. चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येत अडकू शकता. झटपट पैसे कमवण्याच्या नादात शॉर्टकट वापरू नका, अन्यथा संकटात पडाल. जमीन, घर किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
advertisement
5/6
कुंभ - हे सूर्यग्रहण कुंभ राशीतच लागले होते, त्यामुळे या राशीवर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून येईल. मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असून स्वभावातील चिडचिडेपणामुळे रिलेशनमध्ये दुरावा येऊ शकतो. कौटुंबिक जीवनात शांतता राखण्याचा प्रयत्न करा आणि वादांपासून लांब राहा. सध्या लांबचे प्रवास करणे टाळा. येणाऱ्या 15 दिवसांत कोणतीही मोठी जोखीम पत्करू नका किंवा नवीन महत्त्वाच्या कामाची सुरुवात करू नका.
advertisement
6/6
मीन - मीन राशीमध्ये सध्या शनिदेव विराजमान आहेत आणि सूर्य-शनि हे पिता-पुत्र असूनही एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. सूर्यग्रहणाचा प्रभाव मीन राशीच्या लोकांना आर्थिक आघाडीवर त्रासदायक ठरू शकतो. तुमची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने व्यवहारात सावध राहा. व्यवसायात चढ-उतार येतील आणि आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. जुना आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता असल्याने तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Surya Grahan 2026: ग्रहण संपलं तरी या राशींवर काळी छाया 15 दिवस राहणार; भलत्याच अडचणींचा त्रास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल