फक्त नशीबचं बदलत नाही! आरोग्यही सुधारतात 'ही' 9 रत्न, दूर करतात 21 पेक्षा अधिक भयंकर आजार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात रत्नांना केवळ सौंदर्याचे साधन मानले जात नाही, तर ती ग्रहांची ऊर्जा शोषून मानवी शरीरातील दोषांचे निवारण करणारी शक्तिशाली माध्यमे मानली जातात.
advertisement
1/10

ज्योतिषशास्त्रात रत्नांना केवळ सौंदर्याचे साधन मानले जात नाही, तर ती ग्रहांची ऊर्जा शोषून मानवी शरीरातील दोषांचे निवारण करणारी शक्तिशाली माध्यमे मानली जातात. ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे उद्भवणारे आजार योग्य रत्न धारण केल्याने बरे होऊ शकतात, असे 'रत्न चिकित्सा' सांगते. 9 ग्रहांची 9 मुख्य रत्ने आपल्या शरीरातील चक्रांवर आणि ग्रहांच्या लहरींवर परिणाम करून 21 हून अधिक गंभीर आजारांवर प्रभावी ठरू शकतात.
advertisement
2/10
माणिक - सूर्य: माणिक हे सूर्याचे रत्न आहे. हे धारण केल्याने हृदयविकार, हाडांचे आजार, डोळ्यांचे विकार आणि डोकेदुखी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. ज्यांना सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो, त्यांच्यासाठी माणिक ऊर्जा देणारे ठरते.
advertisement
3/10
मोती - चंद्र: मोती चंद्राचे प्रतिनिधित्व करतो. हे रत्न सर्दी-खोकला, निद्रानाश, रक्ताची कमतरता आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. मानसिक शांती आणि चंचल मन स्थिर करण्यासाठी मोती उपयुक्त ठरतो.
advertisement
4/10
कोरल - मंगळ: मंगळ हा रक्ताचा कारक मानला जातो. कोरल धारण केल्याने रक्तदाब, मुळव्याध, त्वचेचे आजार आणि स्नायूंच्या वेदना कमी होतात. तसेच, हे रत्न शस्त्रक्रियेनंतरच्या रिकव्हरीसाठी मदत करते.
advertisement
5/10
पाचू - बुध: बुध ग्रह बुद्धी आणि मज्जासंस्थेशी संबंधित आहे. पन्ना धारण केल्याने स्मरणशक्तीचे विकार, मज्जासंस्थेचे आजार, दमा आणि बोलण्यातील अडथळे दूर होतात. किडनीच्या काही समस्यांवरही पन्ना गुणकारी मानला जातो.
advertisement
6/10
पुष्कराज - गुरु: पुष्कराज हे आरोग्यासाठी सर्वात शुभ रत्न मानले जाते. हे लठ्ठपणा, यकृताचे आजार, कावीळ आणि पोटाचे विकार बरे करण्यास मदत करते. मात्र, डायबेटिस असल्यास हे रत्न तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये.
advertisement
7/10
हिरा - मधुमेह, प्रजनन क्षमतेचे विकार आणि मूत्रविकार यांवर हिरा किंवा ओपल लाभदायक ठरते.
advertisement
8/10
नीलम (शनी): अर्धांगवायू , सांधेदुखी आणि पायांच्या नसांचे आजार नीलम धारण केल्याने बरे होऊ शकतात. मात्र, नीलमची चाचणी केल्याशिवाय तो धारण करू नये.
advertisement
9/10
गोमेद - राहू: गोमेद हे राहू ग्रहाचे रत्न आहे. राहू हा अचानक उद्भवणाऱ्या आजारांचा आणि मानसिक भ्रमाचा कारक मानला जातो. गोमेद धारण केल्याने जठराचे विकार, कर्करोग (सुरुवातीचा टप्पा), संसर्गजन्य रोग आणि कुष्ठरोग यांसारख्या व्याधींमध्ये आराम मिळतो.
advertisement
10/10
ओपल - शुक्र: जर तुम्हाला हिरा परवडणारा नसेल, तर शुक्र ग्रहासाठी 'ओपल' हे उपरात्न म्हणून वापरले जाते. हे सौंदर्याचे आणि आरोग्याचे प्रतीक आहे. ओपल हे डोळ्यांचे आरोग्य, संप्रेरकांचे असंतुलन आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
फक्त नशीबचं बदलत नाही! आरोग्यही सुधारतात 'ही' 9 रत्न, दूर करतात 21 पेक्षा अधिक भयंकर आजार