TRENDING:

Weekly Horoscope: धनू, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; आठवड्यात नवा विक्रम रचणार, पण..

Last Updated:
Weekly Horoscope: फेब्रुवारी महिना आणि महिन्याचा पहिला आठवडा एकत्र माघी पौर्णिमेपासून सुरू होत आहे. पहिल्या आठवड्यातील ग्रहांची स्थिती काही राशीच्या लोकांना लाभाची ठरणार आहे. कधी नव्हे ते साध्य करण्याचे योग काही राशींच्या नशिबी आहेत. धनू, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊया.
advertisement
1/7
धनू, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; आठवड्यात नवा विक्रम रचणार, पण..
फेब्रुवारीचा पहिला आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी एकूणच चांगला जाणार आहे. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये केलेल्या कामाचे चांगले परिणाम दिसून येतील. कामाचं वातावरण आनंदी राहील आणि मन लावून काम करता येईल. तुमच्या बोलण्यातला गोडवा आणि समजूतदार वागणूक यामुळे दैनंदिन आयुष्यात अनेक गोष्टी सोप्या होतील.
advertisement
2/7
धनु राशीच्या लोकांचे काही जुने प्रश्न किंवा अडचणी आपोआप मार्गी लागण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत आठवडा साधारण राहील, फार मोठी अडचण जाणवणार नाही. अचानक धनलाभाचे योग असल्यामुळे गरजेच्या खर्चांसाठी हातभार लागेल आणि काही रखडलेली कामं पूर्ण होतील.
advertisement
3/7
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना काही बाबतीत दिलासा मिळेल तर काही बाबतीत फायदा होईल. सध्या तुमच्या राशीत सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र हे चार ग्रह एकत्र असल्यामुळे परिणाम मिश्र स्वरूपाचे असतील. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे आणि कामात स्थिरता जाणवेल. मात्र व्यवसाय करणाऱ्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
advertisement
4/7
मकर - आर्थिकदृष्ट्या आठवडा सकारात्मक असला तरी पैशांची देवाणघेवाण करताना विशेष काळजी घ्या, नाहीतर नुकसान होऊ शकते. थंडी आणि वाढत्या प्रदूषणामुळे आईच्या तब्येतीची चिंता वाटू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा असेल. तसेच स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आणि तब्येतीकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे.
advertisement
5/7
फेब्रुवारीचा पहिला आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला ठरणार आहे. या आठवड्यात शुक्र आणि बुध ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी लाभदायक राहील. सामाजिक आणि धार्मिक कामांमध्ये तुमचा सहभाग वाढेल, त्यामुळे समाजात मान-सन्मान मिळेल आणि काही प्रतिष्ठित लोकांशी ओळख होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जुळवून घेऊन वागणं फायद्याचं ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना या आठवड्यात एखादी मोठी संधी, नवीन करार किंवा महत्त्वाची उपलब्धी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
मीन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा थोडा चढ-उतारांचा राहील. या काळात आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटू शकतं, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळ उडू शकतो. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम घरच्या वातावरणावरही होऊ शकतो.
advertisement
7/7
मीन - भावंडांशी वाद टाळणं हिताचं ठरेल. प्रेमसंबंधांमध्येही गैरसमज होण्याची शक्यता असल्याने शांतपणे आणि संयमाने वागणं गरजेचं आहे. खर्चात वाढ होऊ शकते आणि नको असलेल्या प्रवासामुळे थकवा किंवा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे शक्यतो स्वतःसाठी वेळ काढा आणि आराम घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: धनू, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; आठवड्यात नवा विक्रम रचणार, पण..
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल