TRENDING:

Weekly Ank Jyotish: पुन्हा मोठ्या अपघाताचा धोका, अशुभ घडणार! मूलांक 1 ते 9 संपूर्ण साप्ताहिक अंक ज्योतिष

Last Updated:
Weekly Numerology: साप्ताहिक अंकशास्त्रानुसार (16 ते 22 फेब्रुवारी 2026), मूलांक 1 असलेल्यांनी या आठवड्यात त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, आजारी पडू शकता. मूलांक 4 असलेल्यांनी या सात दिवसांत अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, रस्ते अपघाताचा धोका आहे. काळजीपूर्वक वाहन चालवा. या आठवड्यात मूलाकं 7 असलेल्यांनी त्यांच्या कामात जोखीम पत्करली आहे त्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. 1 ते 9 मूलांकांसाठी आठवड्याचे अंकशास्त्र पाहूया.
advertisement
1/9
मोठ्या अपघाताचा धोका, अशुभ घडणार! मूलांक 1 ते 9 संपूर्ण साप्ताहिक अंकज्योतिष
अंक 2026 (कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेले लोक)कामाच्या अतिताणामुळे या आठवड्यात तुम्हाला थकवा आणि थोडा आजारपण जाणवू शकतं. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेली धावपळ तुम्हाला अडचणीत टाकू शकते. मात्र, आर्थिक दृष्टिकोनातून काळ चांगला आहे, तुम्ही तुमचे जुने बिले आणि कर्ज सहज फेडू शकाल. कौटुंबिक तणावामुळे अभ्यासात किंवा कामात लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळ सर्वांच्या आयुष्यात येतो आणि तोच माणसाला खूप काही शिकवतो, हे लक्षात ठेवा. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे; तुमच्या कष्टाचे चीज होऊन समाजात मान-सन्मान वाढेल.
advertisement
2/9
अंक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेले लोक)जर तुम्ही घरातील मोठे व्यक्ती असाल, तर तुमच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक कामात करा, जेणेकरून घरातील लहानांनाही आरोग्यासाठी प्रेरणा मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खूप मजबूत असेल, पण याचे श्रेय स्वतःसोबतच तुमच्या कुटुंबाला आणि जोडीदारालाही द्या. कुटुंबातील लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला थोडी चिडचिड जाणवू शकते. जुनी रखडलेली कामे या आठवड्यात पूर्ण होतील. कामाचा बोजा वाढला तरी तुमच्या नियोजनामुळे तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल. पाहुण्यांच्या अचानक आगमनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे अभ्यासासाठी वेळ काढायला विसरू नका.
advertisement
3/9
अंक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक)आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यात तुम्हाला त्रस्त करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला जीवनाचा पुरेपूर आनंद घेता येणार नाही. आर्थिक बाजूने हा आठवडा चांगला असेल, कारण बचत करण्यासाठी तुम्हाला कुटुंबाची मदत मिळेल. मित्र किंवा जवळच्या व्यक्ती तुमच्या मतांना फारसे महत्त्व देणार नाहीत, ज्यामुळे तुम्हाला थोडे दुर्लक्षित वाटू शकते. कामाच्या ठिकाणी मात्र तुमची प्रगती होईल; तुम्ही अशा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटाल ज्याला भेटण्याची सर्वांची इच्छा असते. या भेटीसाठी पूर्ण तयारीत जा आणि बोलताना जपून बोला. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अपेक्षेपेक्षा चांगला असेल.
advertisement
4/9
अंक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला जन्मलेले लोक)या आठवड्यात वाहन चालवताना विशेष काळजी घ्या, विशेषतः वळणांवर सावध राहा. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे, मग तो कमिशनमधून असो वा रॉयल्टीमधून. घरात थोडे तणावाचे वातावरण राहू शकते, अशा वेळी रागाच्या भरात कोणतेही चुकीचे पाऊल टाकू नका. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमची एक वेगळी छाप पडेल. विद्यार्थ्यांना दुसऱ्यांचे मोबाईल किंवा लॅपटॉप पाहून स्वतःसाठी तशाच महागड्या वस्तूंची मागणी करावीशी वाटेल, पण पालकांच्या कष्टाचा विचार करून अतिरिक्त आर्थिक भार टाकणे टाळा.
advertisement
5/9
अंक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक)आरोग्य थोडे नरम-गरम असल्यामुळे आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल, पण स्वतःवर विश्वास ठेवा. आर्थिक आव्हाने दूर होतील आणि अचानक धनलाभाचे योग येतील. एखादी जवळची व्यक्ती तुमचा विश्वास तोडल्याचे समजल्याने तुम्हाला वाईट वाटू शकते, ज्यामुळे कौटुंबिक वातावरणात थोडे अस्वस्थ वाटेल. नोकरीत तुम्हाला हव्या असलेल्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळेल, ज्यामुळे चेहरा आनंदाने उजळेल. सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप सकारात्मक आहे; ग्रहांच्या स्थितीमुळे नशिबाची साथ मिळेल.
advertisement
6/9
अंक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला जन्मलेले लोक)इतरांच्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला वाटू शकते की नवीन गोष्टी शिकण्याचे तुमचे वय निघून गेले आहे, पण स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमच्या सक्रिय विचारांमुळे तुम्ही काहीही शिकू शकता. कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून तुम्ही प्रवासावर खर्च कराल, पण खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. आपल्या भावना सर्वांसमोर व्यक्त करू नका, कोणीतरी त्याचा गैरफायदा घेऊ शकतं. कुटुंबाचा पाठिंबा तुमच्या कामातील चांगल्या कामगिरीचे मुख्य कारण ठरेल, त्यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि त्यांचे आभार माना.
advertisement
7/9
अंक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला जन्मलेले लोक)या आठवड्यात मन शांत ठेवणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. तुमची काही महत्त्वाची आर्थिक नियोजने यशस्वी होतील, ज्यामुळे भविष्यासाठी चांगली बचत करता येईल. भावंडांच्या मदतीने तुमचे कौटुंबिक आयुष्य सुरळीत चालेल. कामाच्या ठिकाणी नवीन जोखीम पत्करायला तुम्ही घाबरणार नाही, ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे, फक्त कागदपत्रांची पूर्तता आधीच करून ठेवा.
advertisement
8/9
अंक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला जन्मलेले लोक)कामासोबतच आरोग्यासाठी थोडा वेळ नक्की काढा. आठवड्याच्या मध्यात कामाचा ताण वाढू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळाल्याने मन प्रसन्न राहील, कदाचित तुम्ही घरासाठी किंवा लहानांसाठी भेटवस्तू खरेदी कराल. घरात बदल करताना इतरांचे मत नक्की विचारात घ्या, अन्यथा टीकेला सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या महिला सहकाऱ्याशी बोलताना तुमच्या करिअरचे प्लॅन्स शेअर करू नका, त्याचा गैरवापर होऊ शकतो. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी नशिबाची साथ आणि यश मिळवणारा हा काळ असेल.
advertisement
9/9
अंक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला जन्मलेले लोक)आठवड्याच्या सुरुवातीपासून तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि शारीरिक समस्या दूर होतील. दुसऱ्या भागात मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, तुम्ही खरेदी केलेल्या नवीन वस्तूंमुळे घरचे लोक खुश होतील. घरातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही सुट्टी घेऊ शकता. नोकरीत नवीन आव्हाने येतील, ती सोडवण्यासाठी तुमच्या संपर्कांचा वापर करा. विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासाच्या नोट्स किंवा पुस्तक हरवल्यामुळे थोडा ताण येऊ शकतो, ज्यामुळे चिडचिड वाढेल. अशा वेळी स्वतःला दोष देण्यापेक्षा शांत राहून उपाय शोधा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Ank Jyotish: पुन्हा मोठ्या अपघाताचा धोका, अशुभ घडणार! मूलांक 1 ते 9 संपूर्ण साप्ताहिक अंक ज्योतिष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल