Nissan Gravite: 19.6 किमी मायलेज, अखेर आली भारतातील सगळ्यात स्वस्त 7 सीटर MPV, किंमत 5.62 लाख
- Published by:Sachin S
Last Updated:
अखेरीस निसानने आपली बहुप्रतिक्षित Nissan Gravite ही ७ सीटर एमपीव्ही लाँच केली आहे. या Nissan Gravite ची किंमत भारतातील सगळ्यात ७ सीटर गाड्यांपेक्षा कमी आहे.
advertisement
1/9

जपानची वाहन निर्माता कंपनी निसान मोटर्सने अखेर भारतात पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलं आहे. मागील काही दिवसांपासून निसान मोटर्सने भारतात स्वस्तात मस्त अशी ७ सीटर एमपीव्ही लाँच करणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. अखेरीस निसानने आपली बहुप्रतिक्षित Nissan Gravite ही ७ सीटर एमपीव्ही लाँच केली आहे. या Nissan Gravite ची किंमत भारतातील सगळ्यात ७ सीटर गाड्यांपेक्षा कमी आहे.
advertisement
2/9
Nissan Gravite अखेर भारतात लाँच झाली आहे. बोल्ड लूक आणि स्टायलिश लूक असलेली ही Nissan Gravite ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निसान मोटर्सची ही भारतातील पहिलीच एमपीव्ही आहे.
advertisement
3/9
Nissan Gravite ही भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबीयांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलं आहे. Nissan Gravite पाहिल्यावर तुम्हाला renault triber ची आठवण येईल. पण निसान मोटर्स आणि renault ची भागीदारी झाली असून या भागीदारीतूनच निसानने Nissan Gravite भारतात renault triber च्या बेसवर उभी केली आहे.
advertisement
4/9
Nissan Gravite मध्ये एलईडी लाइट्स, बॉडी क्लॅडिंग, क्रूझ कंट्रोल, स६ एअरबॅग्स, एबीएस (ABS), ईबीडी (EBD), आयसोफिक्स चाइल्ड अँकरेज, टीपीएमएस (TPMS), ईएससी (ESC) आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
5/9
Nissan Gravite मध्ये १.० लिटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन दिलं आहे जे ७२ PS पॉवर आणि ९६ Nm टॉर्क जनरेट करतो. हे ताकद कमी असली तरी इंजिन मजबूत आहे. या इंजिनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे (AMT) पर्याय सुद्धा दिले आहे.
advertisement
6/9
मायलेज किती? Nissan Gravite मध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्स असा पर्याय दिला आहे. मॅन्युअल व्हेरियंटमध्ये ही एमपीव्ही १९.३ किमी प्रति लिटर आणि AMT व्हेरियंटमध्ये १९.६ किमी मायलेज देऊ शकते असाा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
7/9
Nissan Gravite मध्ये एकूण ८ व्हेरियंट असणार आहे. यामध्ये CNG व्हेरियंट सुद्धा दााखवण्यात आलं आहे. पण, CNG व्हेरियंटची माहिती अद्याप देण्यात आली नाही.
advertisement
8/9
किंमत किती? Nissan Gravite ची किंमत ही सगळ्यांना आश्चर्यचा धक्का देणारी आहे. Nissan Gravite सुरुवाती किंमत फक्त ५.६५ लाख रुपयांपासून सुरू होते. ही किंमत पहिल्या ५००० ग्राहकांसाठी आहे. इतक्या कमी किंमतीत ७ सीटर एमपीव्ही लाँच करून निसान मोटर्सने भारतात सगळ्यात स्वस्त अशी एमपीव्ही लाँच केली आहे.
advertisement
9/9
आता Nissan Gravite ची मार्केटमध्ये तुलना ही थेट मारुती सुझुकीच्या Maruti Ertiga शी असणार आहे. निसान मोटर्सने Nissan Gravite या एमपीव्हीवर ३ वर्षे किंवा १ लाख किलोमीटरची वॉरंटी दिली आहे, जी १० वर्षे किंवा २ लाख किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Nissan Gravite: 19.6 किमी मायलेज, अखेर आली भारतातील सगळ्यात स्वस्त 7 सीटर MPV, किंमत 5.62 लाख