TRENDING:

5 लाखांच्या बजेटमध्ये CNG कार शोधताय? या गाड्यांमध्ये मिळतं 34KM हून जास्त मायलेज

Last Updated:
Affordable CNG Cars: तुम्ही कमी बजेटमध्येचांगली सीएनजी कार शोधत असाल तर आज आपण परवडणारे काही ऑप्शन्स शोधणार आहोत. चला डिटेल्स जाणून घेऊया.
advertisement
1/6
5 लाखांच्या बजेटमध्ये CNG कार शोधताय? या गाड्यांमध्ये मिळतं 34KMहून जास्त मायलेज
कार घ्यायचा विचार करत असलेले अनेक लोक हे सीएनजी कारच्या शोधात आहेत. भारतीय बाजारात अशा अनेक कार उपलब्ध आहेत. ज्या डेली अप-डाउनसाठी बेस्ट ठरु शकतात. विशेष म्हणजे या कार एक किलो सीएनजीमध्ये 27 किलोमीटरपासून 34 किलोमीटरपर्यंत मायलेज देतात. चला या गाड्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
2/6
Maruti Celerio CNG : पहिली कार Maruti Suzuki Celerio CNG आहे. ज्यामध्ये 998cc चं 3 सिलेंडर इनलाइन इंजिन देण्यात आलं आहे. गाडीचं इंजिन 56 bhp ची पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क जनरेट करते.
advertisement
3/6
Maruti Celerio CNG कारमध्ये सेफ्टीसाठी गाडीमध्ये 6 एयरबॅग्स, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), EBD सह ABS आणि रिवर्स पार्किंग सेन्सरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे कार एक किलो सीएनजीमध्ये 34.43 किलोमीटर पर्यंत मायलेज देऊ शकते. या गाडीची दिलीत एक्स-शोरुम किंमत जवळपास 5.97 लाख रुपये आहे.
advertisement
4/6
Tata Tiago CNG : पुढची कार टाटा टियागो सीएनजी आहे, जी 1199cc, 3-सिलेंडर इनलाइन इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 74 bhp आणि 96.5 Nm टॉर्क निर्माण करते. सेफ्टी फीचर्समध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), हिल होल्ड कंट्रोल आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांचा समावेश आहे. टाटा टियागो सीएनजी प्रति किलो फ्यूलवर 26.49 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. कारची एक्स-शोरूम किंमत 5.49 लाख रुपयांपासून सुरू होते.
advertisement
5/6
Maruti Alto K10 CNG : Maruti Suzuki Alto K10 CNG मध्ये 998cc चा 3 सिलेंडर इनलाइन इंजिन लावलेलं आहे. ज्यामध्ये प्रति सिलेंडर 4 वाल्व आणि SOHC टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हे इंजिन 56 bhp ची पॉवर आणि 82.1 Nm चा टॉर्क जनरेट करते.
advertisement
6/6
सेफ्टीच्या हिशोबाने गाडीमध्ये 6 एयरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), EBD सह ABS आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सरसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. ही कार एक किलो CNG मध्ये 33.40 किमीपर्यंत मायलेज देऊ शकते. Maruti Suzuki Alto K10 CNG ची एक्स शोरुम किंमत 5.31 लाख रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
5 लाखांच्या बजेटमध्ये CNG कार शोधताय? या गाड्यांमध्ये मिळतं 34KM हून जास्त मायलेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल