28 किमी मायलेज, 5 स्टार सेफ्टी अन् किंमतही कमी! कमी पगार असेल तरी घरी येईल SUV, 5 बेस्ट मॉडेल!
- Published by:Sachin S
Last Updated:
जर तुमचा पगार ३५ ते ४० हजार रुपये असेल तर तुम्ही एखादी शानदार अशी एसयूव्ही खरेदी करू शकतात. भारतात सध्या स्वस्त आणि दमदार अशा 5 SUV
advertisement
1/10

भारतात सध्या जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे कारच्या किंमती कमी झाल्या आहे. तर दुसरीकडे एसयूव्ही किंमती आटोक्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मध्यमवर्गीय कुटुंबीयांचा एसयूव्ही खरेदीकडे कल वाढला आहे. जर तुमचा पगार ३५ ते ४० हजार रुपये असेल तर तुम्ही एखादी शानदार अशी एसयूव्ही खरेदी करू शकतात. भारतात सध्या ५ अशा स्वस्त आणि दमदार अशा ५ SUV आहे, ज्यांच्या किंमती कमी आहे आणि फिचर्सही दमदार आहे.
advertisement
2/10
Tata Punch - भारतातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपनीपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सचा यामध्ये पहिला क्रमांक लागतो. मजबूत आणि सेफ्टीमध्ये टाटा मोटर्सच्या गाड्या या नेहमी अव्वल असतात. अशातच अलीकडेच टाटा मोटर्सने आपली Tata Punch चं नवीन फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं.
advertisement
3/10
Tata Punch ची एक्स-शोरूम किंमत 5.59 लाखांपासून सुरू होते. Tata Punch मध्ये 1.0 लिटरचं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं आहे. यामध्ये CNG ऑप्शन सुद्धा आहे. CNG व्हेरिएंटमध्ये Tata Punch ही तब्बल 26.99 किमी मायलेज देते. एवढंच नाहीतर फिचर्समध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, 10.25 इंचाचा टचस्क्रीन, वायरलेस फोन चार्जर, डुअल एअरबॅग आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
4/10
Nissan Magnite - जपानीची कार उत्पादक कंपनी असलेल्या निसान मोटर्सने भारतात सगळ्यात स्वस्त अशी एसयूव्ही म्हणून Nissan Magnite लाँच केली. Nissan Magnite ची सुरुवाती एक्स-शोरूम किंमत 5.61 लाख रुपयांपासून सुरू होते. या एसयूव्हीमध्ये दोन इंजिनचा पर्याय दिला आहे. 1.0 लिटर नॅचुरली एस्पिरेटेड आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल युनिट इंजिन दिलं आहे.
advertisement
5/10
ही Nissan Magnite SUV 19.9 किमी मायलेज देते असा दावा कंपनीने केला आहे. Nissan Magnite मध्ये मल्टी कलर एंबिएंट लायटिंग, 7-इंचाचा डिजिटल डिस्प्ले, वायरलेस चार्जर, स्टँडर्ड 6 एअरबॅग्स, 360 डिग्री कॅमेरा, VDC, ESC आणि TPMS सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
6/10
Maruti Suzuki Fronx - मारुती सुझुकीची Maruti Suzuki Fronx सुद्धा एक चांगला पर्याय आहे. Maruti Suzuki Fronx ची एक्स शोरूम किंमत 6.84 लाखांपासून सुरू होते. या कारमध्ये 1.2 लिटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजनचा पर्याय दिला आहे.
advertisement
7/10
Maruti Suzuki Fronx चं CNG व्हेरिएंट सुद्धा उपलब्ध आहे. मारुतीची गाडी असल्यामुळे Maruti Suzuki Fronx चं मायलेज हे 28.51 किमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या गाडीत 9-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम, हेड-अप डिस्प्ले, क्रूज कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल, 6 एअरबॅग्स, ABS, EBD आणि 360 डिग्री कॅमेरा सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
8/10
Skoda Kylaq - अलीकडेच Skoda भारतात आपली Kylaq SUV लाँच केली. ही एक बजेट फ्रेंडली एसयूव्ही आहे. या Skoda Kylaq ची किंमत 7.59 लाख रुपयांपासून सुरू होते. Skoda Kylaq मध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे 19.68 किमी मायलेज देतं. या SUV मध्ये 10.1 इंचाची टचस्क्रीन, 8 इंचाचाडिजिटल क्लस्टर, सिंगल-पॅन सनरूफ, वेंटिलेटेड सीट्स, 6 एअरबॅग, TPMS आणि 25 पेक्षा जास्त फिचर्स आहे.
advertisement
9/10
Kia Syros - दक्षिण कोरियन कंपनी असलेल्या Kia मोटर्सने अलीकडे भारतात Kia Syros लााँच केली आहे. Kia Syros ची किंमत 8.67 लाख रुपयांपासून सुरू होते. Kia Syros मध्ये 1.0 लिटर पेट्रोल आणि 1.4 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय दिलाा आहे.
advertisement
10/10
Kia Syros मध्ये 1.0 लिटर पेट्रोल आणि 1.4 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय दिलाा आहे. Kia Syros ही 20.75 किमी मायलेज देते असा दावा कंपनीने केला आहे. Kia Syros मध्ये 12.3 इंचाचं डुअल-स्क्रीन सेटअप, डुअल-जोन AC, 4-वे पावर्ड ड्राइव्हर सीट, एम्बिएंट लायटिंग, वायरलेस चार्जर, 6 एअरबॅग, लेव्हल-2 ADAS आणि 360 डिग्री कॅमेरा सारखे फिचर्स दिले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
28 किमी मायलेज, 5 स्टार सेफ्टी अन् किंमतही कमी! कमी पगार असेल तरी घरी येईल SUV, 5 बेस्ट मॉडेल!