TRENDING:

Microwave : मायक्रोवेव्हमध्ये स्टील आणि धातू ठेवला तर स्पार्क का होतो? यामागचं सायन्स जाणून घ्या, म्हणजे टळेल खूप मोठा अपघात

Last Updated:
Microwave : कधी विचार केलाय का, की काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यात शांतपणे गरम होणारं अन्न, धातूचा चमचा ठेवताच चटचट आवाज का करतात किंवा त्यातून स्पार्क का होऊ लागतो? यामागे जादू नसून एक रंजक 'फिजिक्स' आहे. चला तर मग, हे सायन्स सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
1/9
मायक्रोवेव्हमध्ये धातू ठेवला तर स्पार्क का होतो? यामागचं सायन्स जाणून घ्या
आजच्या धावपळीच्या युगात 'मायक्रोवेव्ह ओव्हन' हे स्वयंपाकघरातील एक अविभाज्य भाग बनलं आहे. रात्रीचं उरलेलं जेवण गरम करणं असो किंवा झटपट केक बनवणं, मायक्रोवेव्ह आपलं काम सोपं करतो. पण, मायक्रोवेव्ह वापरताना आपल्याला वारंवार एक सूचना दिली जातेक की "यात धातूचं (Metal) कोणतंही भाडं किंवा वस्तू ठेवू नका."
advertisement
2/9
कधी विचार केलाय का, की काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यात शांतपणे गरम होणारं अन्न, धातूचा चमचा ठेवताच चटचट आवाज का करतात किंवा त्यातून स्पार्क का होऊ लागतो? यामागे जादू नसून एक रंजक 'फिजिक्स' आहे. चला तर मग, हे सायन्स सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
3/9
मायक्रोवेव्ह नेमकं काम कसं करतं?हे समजून घेण्यासाठी आधी मायक्रोवेव्ह कसं चालतं हे पाहू. मायक्रोवेव्हच्या आत एक 'मॅग्नेट्रॉन' (Magnetron) नावाचं यंत्र असतं, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी (Electromagnetic waves) तयार करतं. या लहरी अन्नातील पाण्याचे रेणू (Water molecules) वेगाने हलवतात. या हालचालीमुळे घर्षण निर्माण होतं आणि त्या उष्णतेतून तुमचं अन्न गरम होतं.
advertisement
4/9
धातू आणि मुक्त इलेक्ट्रॉन्सकाच, कागद किंवा प्लास्टिकमधून या लहरी आरपार निघून जातात, म्हणून ती भांडी गरम होत नाहीत. मात्र, धातूची गोष्ट वेगळी आहे. धातू हे विजेचे उत्तम वाहक (Conductors) असतात. धातूंमध्ये मोठ्या प्रमाणात 'मुक्त इलेक्ट्रॉन्स' असतात.जेव्हा मायक्रोवेव्हच्या लहरी या धातूवर आदळतात, तेव्हा ते इलेक्ट्रॉन्स अत्यंत वेगाने इकडून तिकडे पळायला लागतात. धातूच्या सपाट पृष्ठभागावर हे इलेक्ट्रॉन्स सहज फिरू शकतात, पण खरी समस्या तिथे येते जिथे धातूला टोकदार कडा असतात.
advertisement
5/9
स्पार्क किंवा ठिणग्या का पडतात?जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये स्टीलचा चमचा किंवा अल्युमिनियम फॉइल ठेवली, तर त्यातील टोकदार कडांवर (Edges) हे पळणारे इलेक्ट्रॉन्स एकाच वेळी मोठ्या प्रमाणात जमा होतात.
advertisement
6/9
जेव्हा एकाच ठिकाणी खूप जास्त विद्युत भार (Electric charge) जमा होतो, तेव्हा तो हवेतील रेणूंना विलग करतो. या प्रक्रियेतून विद्युत प्रवाह हवेतून उडी मारतो (Arcing), ज्याला आपण 'स्पार्किंग' किंवा 'ठिणग्या उडणे' म्हणतो. जर हा स्पार्क जास्त वेळ राहिला, तर ओव्हनच्या आत आग लागू शकते किंवा मॅग्नेट्रॉन जळून तुमचं महागडं मशीन खराब होऊ शकतं.
advertisement
7/9
आता तुम्ही विचार कराल की मायक्रोवेव्हच्या आतील भिंती तर धातूच्याच असतात, मग त्या का जळत नाहीत? याचं कारण असं की, आतील भिंती या सपाट आणि जाड असतात. तिथे इलेक्ट्रॉन्स जमा होण्यासाठी टोकदार कडा नसतात. त्या भिंती आरशासारखं काम करतात आणि लहरींना परावर्तित (Reflect) करून अन्नाकडे ढकलतात.
advertisement
8/9
अल्युमिनियम फॉइल: याचे कोपरे खूप टोकदार असतात, त्यामुळे यात सर्वात जास्त स्पार्किंग होतं.गोल्डन बॉर्डर असलेल्या प्लेट्स: काही चिनी मातीच्या प्लेट्सवर सोन्याची किंवा चांदीची नक्षी असते. हा पातळ धातू मायक्रोवेव्हमध्ये लगेच जळतो आणि प्लेटला तडा जाऊ शकतो.स्टीलचे डबे: चुकूनही टिफिनचे डबे किंवा चमचे आत ठेवू नका.
advertisement
9/9
विज्ञानाचा नियम साधा आहे. मायक्रोवेव्ह लहरी आणि धातूच्या टोकदार कडा एकत्र आल्या की ठिणग्या उडणारच! त्यामुळे तुमचं ओव्हन आणि घर सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी 'मायक्रोवेव्ह सेफ' भांडीच वापरा. एका लहानशा चुकीमुळे होणारा मोठा अपघात टाळणं आपल्याच हातात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Microwave : मायक्रोवेव्हमध्ये स्टील आणि धातू ठेवला तर स्पार्क का होतो? यामागचं सायन्स जाणून घ्या, म्हणजे टळेल खूप मोठा अपघात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल