TRENDING:

Panipuri Benefits : आता बिनधास्त खा पाणीपुरी! समोर आले धक्कादायक फायदे; वाचाल तर एक प्लेट एक्ट्राच मागवाल

Last Updated:
बऱ्याचदा आपल्याला वाटतं की पाणीपुरी म्हणजे फक्त जंक फूड, पण जर ती स्वच्छ पद्धतीने बनवली असेल, तर या चटपटीत पदार्थात अनेक पोषक घटक दडलेले आहेत. आज आपण पाणीपुरीचे असेच काही अनपेक्षित फायदे जाणून घेणार आहोत, जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल!
advertisement
1/8
बिनधास्त खा पाणीपुरी! तज्ज्ञांनी सांगितले फायदे; वाचून एक प्लेट एक्ट्राच मागवाल
गरमी असो वा पाऊस, किंवा कडक हिवाळा... पाणीपुरी प्रत्येक सिजनमध्ये बेस्ट आहे. तिचं नाव काढताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं! चटपटीत पाणी, कुरकुरीत पुरी आणि त्यात भरलेले मसालेदार बटाटे-चणे... हा अनुभव घेण्यासाठी आपण कितीही लांब जायला तयार असतो. पण, तुम्हाला माहित आहे का, ही फक्त जिभेची चटक नाही तर आरोग्यासाठीही पाणीपुरीचे काही छुपे फायदे आहेत
advertisement
2/8
बऱ्याचदा आपल्याला वाटतं की पाणीपुरी म्हणजे फक्त जंक फूड, पण जर ती स्वच्छ पद्धतीने बनवली असेल, तर या चटपटीत पदार्थात अनेक पोषक घटक दडलेले आहेत. आज आपण पाणीपुरीचे असेच काही अनपेक्षित फायदे जाणून घेणार आहोत, जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
advertisement
3/8
मूड फ्रेशनर आणि स्ट्रेस बस्टरदिवसभराच्या कामामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे तुमचा मूड खराब झाला आहे का? किंवा तुम्ही थोड्या तणावाखाली आहात? तर मग एक प्लेट पाणीपुरी नक्की मुड बदलतो. पाणीपुरीतील तिखट, आंबट आणि गोड चव तुमच्या जिभेला उत्तेजित करतो आणि एंडोर्फिन (Endorphins) नावाचे हॅपी हार्मोन्स (Happy Hormones) सोडण्यास मदत करतो. यामुळे तुमचा मूड लगेच फ्रेश होतो आणि तणाव कमी व्हायलाही मदत होते.
advertisement
4/8
पचनास मदत करते (योग्य प्रकारे बनवल्यास)विश्वास बसणार नाही, पण पाणीपुरीतील काही घटक पचनासाठी चांगले असू शकतात. पाणीपुरीचे पाणी (जलजीरा पाणी) जिरे, पुदीना, आलं, हिरवी मिरची आणि काळ्या मिठाने बनवलेले असते. हे सर्व पदार्थ पचन सुधारण्यास मदत करतात. जिरे आणि पुदीना गॅस कमी करण्यास मदत करतात, तर आलं पचनशक्ती वाढवते. मात्र, यासाठी पाणीपुरीचे पाणी ताजे आणि स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे.
advertisement
5/8
डिहायड्रेशनवर उपाय (उन्हाळ्यात विशेषतः)उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. अशा वेळी पाणीपुरीचे मसालेदार आणि थंडगार पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. लिंबू, पुदीना आणि जलजिरा पावडर असलेले पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित राखण्यास मदत करते आणि शरीराला ताजेतवाने करते.
advertisement
6/8
प्रतिकारशक्ती वाढवते (काही प्रमाणात)पाणीपुरीच्या पाण्यात वापरले जाणारे काही घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतात. उदाहरणार्थ, आलं आणि हिरवी मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. पुदीना आणि कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला रोगांशी लढण्यास मदत करतात. अर्थात, हे प्रमाण कमी असले तरी ते एक लहान पूरक म्हणून काम करू शकते.
advertisement
7/8
नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशनला मदतकाही प्रमाणात पाणीपुरीचे पाणी नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन (Detoxification) म्हणून काम करू शकते. पुदीना, जिरे आणि लिंबू यांसारखे घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि यकृत (Liver) निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे शरीराची अंतर्गत स्वच्छता होऊन तुम्हाला हलके वाटते.
advertisement
8/8
थोडक्यात काय, आपली आवडती पाणीपुरी केवळ चवीपुरतीच मर्यादित नाही, तर योग्य पद्धतीने खाल्ली तर ती आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. तर मग, आता पुढच्या वेळी पाणीपुरी खाताना 'हेल्थ कॉन्शस' वाटल्यास, वरील फायदे नक्की आठवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Panipuri Benefits : आता बिनधास्त खा पाणीपुरी! समोर आले धक्कादायक फायदे; वाचाल तर एक प्लेट एक्ट्राच मागवाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल