फॉर्च्युनर आता विकून टाका! एकदा टँक फुल केलं की 1226 किमी कुठेही फिरा, येतेय धाकड SUV
- Published by:Sachin S
Last Updated:
दमदार फिचर्स आणि उत्तम रेंज मिळत असल्यामुळे ईव्ही गाड्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. अशातच आता भारतात लवकरच 1226 किमी रेंज देणारी एसयूव्ही लाँच होण्याची शक्यता आहे. भारतात आतापर्यंत सगळ्यात जास्त रेंज देणारी एसयूव्ही ठरणार आहे.
advertisement
1/9

भारतात सध्या जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे दर महिन्याला नवी नवीन एसयूव्ही लाँच होत आहे. कमी किंमती कार आणि एसयूव्ही आता मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. तर दुसरीकडे ईव्ही गाड्यांचा दबदबा वाढत चालला आहे. दमदार फिचर्स आणि उत्तम रेंज मिळत असल्यामुळे ईव्ही गाड्याा खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. अशातच आता भारतात लवकरच 1226 किमी रेंज देणारी एसयूव्ही लाँच होण्याची शक्यता आहे. भारतात आतापर्यंत सगळ्यात जास्त रेंज देणारी एसयूव्ही ठरणार आहे.
advertisement
2/9
भारतात सध्या परदेशी वाहन उत्पादक कंपन्यांना भारताचे दार मोकळे झाले आहे. भारतात आता चीनची स्टार्टअप कंपनी असलेल्या 'रॉक्स मोटर' (Rox Motor)ने भारतात आपल्या दमदार अशा Rox Adamas आणि Rox 01 या एसयूव्हीला पेटेंट मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.
advertisement
3/9
ही एक फुल साईज लक्झरी हायब्रिड SUV आहे. एकदा फुल चार्ज आणि फुल टँक केल्यावर तब्बल 1,226 किलोमीटर अंतर पार करेल, असा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
4/9
इंजिन कसं आहे? Rox 01 मध्ये 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिलं जाणार आहे. तसंच सोबत 56.01 kWh इतकी मोठी बॅटरी दिली जाणार आहे. भारतात ही सगळ्यात मोठी बॅटरी असलेली एसयूव्ही ठरणार आहे. यामध्ये डुअल-मोटर 4WD सिस्टिम 469bhp पॉवर आणि 740Nm इतका पॉवरफुल टॉर्क जनरेट करणार आहे.
advertisement
5/9
ही एसयूव्ही अवघ्या 5.5 सेकंदात 0 ते 100 किमी अंतर वेग गाठू शकते. ही Rox 01 एसयूही फक्त ईलेक्ट्रिक मोडवर चालवली तर 235 किमी इतकी रेंज मिळणार आहे. तर हायब्रिडमध्ये १२२६ किमी इतकी रेंज मिळणार असा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
6/9
ROX 1 नेमकी आहे कशी? - Rox 01 ही एक लांब आणि मोठी अशी एसयूव्ही आहे. फॉर्च्युनर, महिंद्रा स्कॉर्पिओ N च्या कॅटेगरीमधील ही एसयूव्ही असणारा आहे. या Rox 01 मध्ये 21-इंचाचे अलॉय व्हिल्स दिले जाणार आहे. भारतात येणाऱ्या Rox 01 मध्ये लिंडार नावाची सिस्टिम असणार आहे. हे फिचर ADAS लेव्हल २ साठी काम करतंय.
advertisement
7/9
या गाडीची लांबी 5,298 mm, रुंदी 1,985 mm आणि उंची 1,856 mm इतकी आहे. तर Rox 01 चा व्हिलबेस 3,010 mm इतका लांब आहे. या गाडीच्या केबिनमध्ये भरपूर असा स्पेस दिला आहे. ही एसयूव्ही 770 mm इतक्या पाण्यातही आरामात चालू शकते.
advertisement
8/9
केबिनमध्ये प्रायव्हेट जेटसारखी जागा Rox 01 ही एक लक्झरी एसयूव्ही असणार आहे. त्यामुळे Rox 01 च्या केबिनमध्ये तुम्हाला एखाद्या प्रायव्हेट जेटसारखा फिल येईल. यामध्ये ६ आणि ७ सीटर असा पर्याय दिला जाणारआहे. ६ सीटरमध्ये लक्झरी लाऊंज सीट दिले जाणार आहे. यामध्ये मसाज, हिटिंग आणि व्हेंटिलेशनसह पाय ठेवण्यासाठी सपोर्ट दिला जाईल. डॅशबोर्डवर 15.7-इंचाची 3K हाय-रिझ्याल्युशन टचस्क्रीन असणार आहे. या गाडीमध्ये तब्बल १४ स्पीकर्स दिले जाणार आहे.
advertisement
9/9
भारतात Rox ही कंपनी स्वस्त: कार लाँच करणार की कोणत्या कंपनीसोबत भागीदारीने लाँच करणार हे, मात्र अद्याप निश्चित नाही. पण, दिवाळीपर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
फॉर्च्युनर आता विकून टाका! एकदा टँक फुल केलं की 1226 किमी कुठेही फिरा, येतेय धाकड SUV