TRENDING:

Mumbai Indians : रोहित-हार्दिकसह अख्खी टीम पोहोचली, पण बुमराह कुठे? मुंबई इंडियन्सची धडधड वाढली!

Last Updated:
आयपीएल 2026 चा मोसम सुरू व्हायला आता फक्त 5 दिवस शिल्लक आहेत, पण त्याआधीच मुंबई इंडियन्सची चिंता वाढवणारं वृत्त समोर आलं आहे.
advertisement
1/7
रोहित-हार्दिकसह अख्खी टीम पोहोचली, पण बुमराह कुठे? मुंबई इंडियन्सची धडधड वाढली!
28 मार्चला आयपीएलच्या 19व्या मोसमाचा पहिला सामना होणार आहे. गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातल्या मॅचने आयपीएलला सुरूवात होईल, तर 29 मार्चला मुंबई इंडियन्सचा सामना केकेआरविरुद्ध होणार आहे, पण या सामन्याआधीच मुंबई इंडियन्सना धडकी भरवणारी अपडेट समोर आली आहे.
advertisement
2/7
मुंबई इंडियन्सचे खेळाडू आयपीएलसाठी टीममध्ये दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेन्ट बोल्ट, क्विंटन डिकॉक, रियान रिकलटन या दिग्गज खेळाडूंची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री झाली आहे, पण अजूनही जसप्रीत बुमराह मुंबईच्या कॅम्पमध्ये पोहोचलेला नाही.
advertisement
3/7
टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह हा बंगळुरूमध्ये बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल झाला आहे. बुमराह दुखापतीमुळे सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आला आहे का नियमित तपासणीसाठी आला आहे? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
advertisement
4/7
टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या मुंबई इंडियन्सच्या चार खेळाडूंना जास्तची विश्रांती देण्यात आली आहे, असं वक्तव्य मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी केलं होतं. भारताने 8 मार्चला न्यूझीलंडचा पराभव करून टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
advertisement
5/7
वर्ल्ड कप जिंकलेल्या खेळाडूंना आम्ही जास्तची विश्रांती देत आहोत, ते पुढच्या आठवड्यात टीममध्ये सामील होतील, असं महेला जयवर्धने मागच्या आठवड्यात म्हणाले होते.
advertisement
6/7
बुमराह सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये नेमका दुखापतीमुळे गेला आहे का रुटिन चेकअपसाठी गेला आहे? हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल, पण बुमराहला दुखापत झाली असेल तर मात्र हा मुंबई इंडियन्ससाठी सगळ्यात मोठा धक्का असेल.
advertisement
7/7
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, त्यात जसप्रीत बुमराहचं योगदान सर्वाधिक राहिलं आहे. बुमराह हा मुंबई इंडियन्सच्या टीमचा हुकमी एक्का आहे, त्यामुळे तो फिट असणं मुंबई आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : रोहित-हार्दिकसह अख्खी टीम पोहोचली, पण बुमराह कुठे? मुंबई इंडियन्सची धडधड वाढली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल