TRENDING:

Car: फॅमिलीची सुरक्षाही महत्त्वाची! Tata चा छोटा टँक, 28 किमी मायलेज अन् किंमत 4.57 पासून

Last Updated:
काही गाड्यांच्या किंमती या स्वस्त असतात पण मजबुतीच्या बाबतीत सेफ्टी रेटिंग या कमी असतात. पण, टाटा मोटर्सची सगळ्यात मजबूत आणि कमी किंमत असलेली टाटा टिआगो ही याला अपवाद आहे. मजबूत बॉडी आणि दमदार मायलेजमुळे टाटा टिआगोनं मार्केट चांगलंच गाजवलं आहे. 
advertisement
1/8
Car: फॅमिलीची सुरक्षाही महत्त्वाची! Tata चा छोटा टँक, 28 किमी मायलेज अन् किंमत 4.57 पासून
आपल्या दारात एखादी कार असावी असं प्रत्येकाचा स्वप्न असतं. त्यामुळे जो तो आपल्या आर्थिक गणित मांडून कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असतो. पण, स्वस्तात भेटणारी कोणतीही कार ही सेफ्टीमध्ये मजबूत असते असं नाही. काही गाड्यांच्या किंमती या स्वस्त असतात पण मजबुतीच्या बाबतीत सेफ्टी रेटिंग या कमी असतात. पण, टाटा मोटर्सची सगळ्यात मजबूत आणि कमी किंमत असलेली टाटा टिआगो ही याला अपवाद आहे. मजबूत बॉडी आणि दमदार मायलेजमुळे टाटा टिआगोनं मार्केट चांगलंच गाजवलं आहे. 
advertisement
2/8
फेब्रुवारी २०२६ मध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ५ टॉप बेस्ट सेलिंग कारमध्ये tata tiago नं आपलं स्थान पटकावलं आहे. मागील महिन्यात तब्बल  ७,०४० युनिटची विक्री झाली आहे.  tata tiago ची किंमत ही ४.५७ लाखांपासून सुरू होते.
advertisement
3/8
तर टॉप मॉडेल हे ७.८२ लाख इतकी आहे. यामध्ये tata tiago   XE पासून ते टॉप XZ+ हे  १७ व्हेरियंट उपलब्ध आहे. ५ लाखांच्या बजेटमध्ये ही सगळ्यात बेस्ट कार आहे. यामध्ये  tata tiago iCNG व्हेरिएंटही मागणीही मोठी आहे. 
advertisement
4/8
tata tiago मध्ये  १.२ लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन दिलं आहे.  जे ८६ PS पॉवर आणि ११३ Nm टॉर्क जनरेट करतो. हेच इंजिन, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये सुद्धा मिळतं. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक ट्रान्समिशेनमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, CNG मध्ये सुद्धा एमटी ट्रान्समिशेन दिलं आहे. 
advertisement
5/8
tata tiago च्या मायलेजबद्दल बोलायचं झालं तर   पेट्रोल व्हेरिएंटमध्ये १९ ते १९.०१ किमी इतकं मायलेज देतं, असा दावा कंपनीने केला आहे. पण शहरी भागात हे मायलसेज १८ ते १९ किमी इतकं आहे.  तर सीएनजी व्हेरियंटमध्ये ही गाडी 26 ते २८ किमी इतकं मायलेज देते. 
advertisement
6/8
tata tiago च्या आतमध्ये डिझाईन हे चांगलं दिलं आहे. यामध्ये तुम्हाला  १०.२५ इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिलाा आहे. तसंच, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, ऑटोमॅटिक एसी, क्रूझ कंट्रोल आणि हाईट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट या सारखे फिचर्स दिले आहे. 
advertisement
7/8
तर tata tiago च्या बाहेरचा लूक पाहिला तर  एलईडी हेडलॅम्प्स, १५ इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि ड्युअल-टोन रूफ दिला आहे.
advertisement
8/8
आता सुरक्षेच्या बाबतीत विचार केला तर  tata tiago ला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये ४-स्टार रेटिंग मिळाले होते. या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, एबीएससह ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल होल्ड कंट्रोल आणि टीपीएमएस यासारखे फिचर्स दिले आहे.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Car: फॅमिलीची सुरक्षाही महत्त्वाची! Tata चा छोटा टँक, 28 किमी मायलेज अन् किंमत 4.57 पासून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल