TRENDING:

Tata Sierra तुम्ही 50 हजार रुपये सॅलरी असल्यावर खरेदी करु शकता का? पाहा कॅलक्युलेशन

Last Updated:
Tata Sierra EMI Calculation: प्रत्येकाचं आपली स्वतःची कार असावी असं स्वप्न असतं. अशावेळी तुम्हाला टाटा सिएरा कार घ्यायची इच्छा असेल पण तुमचा पगार हा 50 हजार असेल तर तुम्ही नेमकं काय करावं पाहूया...
advertisement
1/6
Tata Sierra तुम्ही 50 हजार रुपये सॅलरी असल्यावर खरेदी करु शकता? पाहा कॅलक्युलेशन
मुंबई : टाटा मोटर्सने 2025 च्या नोव्हेंबर महिन्यात आपली बहुप्रतिक्षित सिएरा लॉन्च केली आहे. टाटा सिएराचा फ्यूचरिस्टिक डिझाइन आणि दमदार फीचर्स लोकांना खुप आवडत आहेत. तुम्हीही ही गाडी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल आणि फूल पेमेंट देऊन तुम्हाला ईएमआयवर ती खरेदी करायची असेल तर आपण या गाडीचा पूर्ण फायनेन्स प्लॅन पाहणार आहोत.
advertisement
2/6
Tata Sierra Dieselच्या Smart Plus व्हेरिएंटला त्याचे बेस मॉडेल मानले जाते. दिल्लीमध्ये त्याची अंदाजे ऑन-रोड किंमत अंदाजे 15,34,926 रुपये आहे. ग्राहकांनी ₹2 लाखांचे डाउन पेमेंट केले आणि उर्वरित रकमेसाठी पाच वर्षांसाठी 10 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज घेतले, तर मासिक ईएमआय अंदाजे 32,613 रुपये असेल.
advertisement
3/6
दरमहा किती ईएमआय भरावा लागेल? : याच्या Pure Diesel व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत जवळपास 14.49 लाख रुपये आहे. याची ऑन-रोड किमत जवळपास 17,10,696 रुपये मानली जात आहे. 2 लाख रुपये डाउन पेमेंटनंतर 5 वर्षांचं लोन घेतलं तर या व्हेरिएंटचा ईएमआय जवळपास 36,347 रुपये प्रति महिना येऊ शकतो.
advertisement
4/6
लोन कालावधी वाढवल्यावर मासिक ईएमआय कमी होतो. मात्र एकूण व्याज द्यावं लागतं. खरंतर ईएमआय तुमची डाउन पेमेंट, व्याजदर आणि निवडलेल्या व्हेरिएंटनुसार बदलू शकतो. तुम्ही महिन्यात 1 लाख रुपये कमवत असाल आणि तुमच्यावर कोणतंही मोठं लोन नसेल तर नवीन सिएरा ईएमआयवर खरेदी करा.
advertisement
5/6
Tata Sierra ची फीचर्स : नवीन टाटा सिएरामध्ये अनेक प्रीमियम आणि हाय-टेक फीचर्स देण्यात आले आहेत जे तिला एक लक्झरी एसयूव्ही म्हणून स्थापित करतात. रिपोर्टनुसार, कारमध्ये ट्रिपल डिस्प्ले सेटअप असेल, ज्यामध्ये एक स्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी, दुसरी सेंट्रल इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी आणि तिसरी पॅसेंजर इन्फोटेनमेंट स्क्रीनसाठी असेल. पॅनोरॅमिक सनरूफ, एलईडी हेडलाइट्स, जेबीएल ऑडिओ सिस्टम आणि व्हेंटिलेटेड सीट्स सारखी फीचर्स देखील अपेक्षित आहेत.
advertisement
6/6
या SUV मध्ये 540-डिग्री सराउंड कॅमेरा व्ह्यू, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट, सोबतच वायरलेस मोबाईल चार्जिंग सिस्टमही उपलब्ध असेल. सुरक्षेसाठी यामध्ये Level-2 ADAS (Advanced Driver Assistance System), ABS, EBD, ESC, हिल असिस्ट आणि ISOFIX चाइल्ड एंकरेजसारखे फीचर्स दिले जातील. या व्यतिरिक्त टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्मटही (TPMS) समाविष्ट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata Sierra तुम्ही 50 हजार रुपये सॅलरी असल्यावर खरेदी करु शकता का? पाहा कॅलक्युलेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल