उद्या होलाष्टकचा तिसरा दिवस! चुकूनही केलात 'ही' काम, तर घडेल भयंकर; कुटुंबालाही सोसावे लागतील हाल
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
सध्या होलाष्टकाचा काळ सुरू आहे. 24 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेले हे होलाष्टक 3 मार्चपर्यंत असणार आहे. उद्या, 26 फेब्रुवारी 2026 रोजी होलाष्टकाचा तिसरा दिवस आहे. शास्त्रानुसार, होलाष्टकाच्या आठ दिवसांत आठ वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव उग्र असतो.
advertisement
1/7

सध्या होलाष्टकाचा काळ सुरू आहे. 24 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेले हे होलाष्टक 3 मार्चपर्यंत असणार आहे. उद्या, 26 फेब्रुवारी 2026 रोजी होलाष्टकाचा तिसरा दिवस आहे. शास्त्रानुसार, होलाष्टकाच्या आठ दिवसांत आठ वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव उग्र असतो. तिसऱ्या दिवशी शनी ग्रहाचा प्रभाव अधिक प्रभावी मानला जातो, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक कष्टांची शक्यता वाढते. जर तुम्ही उद्याच्या दिवशी काही चुका केल्यात, तर तुम्हाला केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर मोठ्या कौटुंबिक संकटांचाही सामना करावा लागू शकतो.
advertisement
2/7
आर्थिक गुंतवणूक टाळा: उद्याच्या दिवशी कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करू नका. शनीच्या प्रभावामुळे तुमचे निर्णय चुकू शकतात, ज्यामुळे भविष्यात मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल.
advertisement
3/7
घरगुती वादविवाद टाळा: होलाष्टकाच्या तिसऱ्या दिवशी घरातील वातावरण कलहपूर्ण राहण्याची शक्यता असते. किरकोळ कारणावरून होणारे वाद विकोपाला जाऊ शकतात. शक्यतो शांत राहा आणि कोणाशीही वाद घालू नका, अन्यथा घरात नकारात्मकता कायमची घर करेल.
advertisement
4/7
प्रवासात सावधगिरी बाळगा: उद्या लांबचा प्रवास करणे टाळावे. जर प्रवास करणे अनिवार्य असेल, तर वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. या काळात अपघाताचे योग प्रबळ असतात, त्यामुळे प्रवास करताना 'हनुमान चालीसा' वाचणे फायदेशीर ठरेल.
advertisement
5/7
जमिनीचे किंवा मालमत्तेचे व्यवहार: घर खरेदी, जमिनीची टोकन रक्कम देणे किंवा घराचे बांधकाम सुरू करणे यांसारखी कामे उद्या करू नका. होलाष्टकात सुरू केलेली वास्तू कधीही फळदायी ठरत नाही आणि तिथे राहणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या सतावू शकतात.
advertisement
6/7
केस कापणे किंवा नखे काढणे: शास्त्रीय दृष्टिकोनातून, या काळात शरीरातील ऊर्जा कमकुवत असते. केस कापणे किंवा नखे काढणे यांसारखी कामे अशुभ मानली जातात. यामुळे शरीरातील नकारात्मकता वाढू शकते.
advertisement
7/7
महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी: जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या करारावर किंवा कागदपत्रांवर स्वाक्षरी करणार असाल, तर ती प्रक्रिया 3 मार्चपर्यंत पुढे ढकलाव्या. या काळात घेतलेले निर्णय भविष्यात तुमच्या विरोधात जाऊ शकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
उद्या होलाष्टकचा तिसरा दिवस! चुकूनही केलात 'ही' काम, तर घडेल भयंकर; कुटुंबालाही सोसावे लागतील हाल