2 वेळा गंभीर अपघात, लग्नाच्या वर्षभरातच घटस्फोट, 38 व्या वर्षी मानसी नाईक पुन्हा करणार लग्न?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
२०२२ साली मानसीने तिचा पहिला पती प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेतला. लग्नाच्या अवघ्या एका वर्षातच ते वेगळे झाल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.
advertisement
1/8

अभिनेत्री मानसी नाईक गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. आजवर तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी तिला तिच्या आयटम साँग्समुळे जास्त चर्चेत राहिली.
advertisement
2/8
२०२२ साली मानसीने तिचा पहिला पती प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेतला. लग्नाच्या अवघ्या एका वर्षातच ते वेगळे झाल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. अवघ्या दीड वर्षात त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्ण विराम देण्याचा निर्णय घेतला. मानसीने नवऱ्यावर फसवणुकीचे आरोप करत घटस्फोट दिला.
advertisement
3/8
दरम्यान, बराच काळ सिंगल राहिल्यानंतर मानसीने गेल्या वर्षी तिचं रिलेशनशिप स्टेटस सगळ्यांसमोर उघड केलं होतं. मानसीने फेब्रुवारी महिन्यात तिचा बर्थडे पॅरिसला तिच्या बॉयफ्रेंडबरोबर सेलिब्रेट केला होता. मानसीच्या बॉयफ्रेंडचं नाव राहुल खिसमतराव असं आहे.
advertisement
4/8
राहुल भारतीय असून कामासाठी तो पॅरिसमध्ये राहतो. राहुला हा European Parliamentचा युथ अम्बेसेडर आहे. त्याचप्रमाणे तो ESA - European Space Agencyमध्ये स्पेस सायटिस्ट देखील आहे. मानसीचा बॉयफ्रेंड लेखकही असून THE THEORY OF CREATOR हे पुस्तक त्यानं लिहिलं आहे.
advertisement
5/8
दरम्यान, मानसी नाईक एकदा नाही, तर तब्बल दोन वेळा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली आहे. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वतः मानसीने हे खुलासे केले होते.
advertisement
6/8
रात्रीचा प्रवास करत असताना तब्बल २ वेळा मानसीचा गंभीर अपघात झाला. या अपघातातून ती थोडक्यात बचावली. मात्र, मनात कायम भीतीने घर केलं आहे.
advertisement
7/8
एका अपघातात तिची संपूर्ण टीम तिच्यासोबत होती. त्या अपघातामध्ये तिच्या डोळ्याला लागलं होतं, तर तिच्या बॉडीगार्डच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता.
advertisement
8/8
दुसऱ्या अपघातात तिच्या गाडीच्या ड्रायव्हरला झोप लागली आणि त्यांची गाडी ट्रकला धडकली. त्यानंतर तिने रात्रीचा प्रवास करणं थांबवलं. या दोन अपघातानंतर तिचा देवावरचा विश्वास अजून वाढला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 वेळा गंभीर अपघात, लग्नाच्या वर्षभरातच घटस्फोट, 38 व्या वर्षी मानसी नाईक पुन्हा करणार लग्न?