हॉरर, सस्पेन्स, अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी! मोठ्या पडद्यावर जबरदस्त कॉकटेल; फेब्रुवारीत रिलीज होणाऱ्या फिल्म्सची लिस्ट
- Published by:Priya Lad
Last Updated:
February Release Film List : फेब्रुवारी 2026 हा महिना फिल्म प्रेमींसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन आला आहे. महिनाभरात तब्बल 8 हिंदी फिल्म्स रिलीज होणार आहेत. या संपूर्ण फिल्म्सची यादी.
advertisement
1/8

जानेवारीमध्ये बॉर्डर 2 आणि मर्दानी 3 आणि इक्कीस सारख्या फिल्म्स आल्यानंतर आता फेब्रुवारी हा महिना बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ठरणार आहे. या महिन्यात प्रेक्षकांना कॉमेडी, थ्रीलर आणि रोमान्सचा एक डोस अनुभवायला मिळणार आहे. 6 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी, संपूर्ण महिना चित्रपट रसिकांसाठी मनोरंजनाने भरलेला असणार आहे.
advertisement
2/8
वध 2 : 2022 च्या हिट क्राइम थ्रीलर 'वध'चा सिक्वेल या महिन्याच्या सुरुवातीला येत आहे. दिग्दर्शक जसपाल सिंग संधू यांचा हा चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांची भूमिका असलेली ही फिल्म तुरुंगाच्या भिंतींमागे निर्माण झालेल्या बंधनावर, न्यायाचा शोध आणि त्यात येणाऱ्या नैतिक दुविधांवर केंद्रीत आहे. हा रहस्य, गुन्हेगारी आणि भावनिक खोलीने भरलेला चित्रपट आहे.
advertisement
3/8
भाभीजी घर पर हैं : फन ऑन द रन : फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'भाभीजी घर पर हैं! फन ऑन द रन' याचाही समावेश आहे. लोकप्रिय टीव्ही शो 'भाभीजी घर पर हैं!' वर आधारित फिल्म 6 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. शशांक बाली दिग्दर्शित या चित्रपटात आसिफ शेख, रोहिताश्व गौर, शुभांगी अत्रे, विदिशा श्रीवास्तव आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
advertisement
4/8
हॉन्टेड 3डी : घोस्ट्स ऑफ द पास्ट : हॉररचे उस्ताद विक्रम भट्ट पुन्हा एकदा प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांची नवीन फिल्म 'हॉन्टेड 3डी : घोस्ट्स ऑफ द पास्ट' 6 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. महाक्षय चक्रवर्ती, चेतना पांडे आणि श्रुती प्रकाश या फिल्ममध्ये आहेत.
advertisement
5/8
अस्सी : 'थप्पड' आणि 'मुल्क'सारख्या फिल्ममध्ये तापसी पन्नूसोबत काम केलेले दिग्दर्शक अनुभव सिन्हा 20 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या एका इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामासह येत आहेत. सामाजिक समस्या, तपास आणि न्यायासाठीच्या लढाईवर आधारित या चित्रपटात तापसी पन्नू एका दमदार भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
6/8
तू या मैं : दिग्दर्शक बिजॉय नांबियार 13 फेब्रुवारी रोजी एक सर्व्हायव्हल थ्रीलर घेऊन येत आहेत. दोन कंटेंट क्रिएटर्समधील साहसी खेळाभोवती फिरणाऱ्या या चित्रपटात शनाया कपूर आणि आदर्श गौरव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात रोमान्स आणि भीतीचं मिश्रण असेल.
advertisement
7/8
दो दीवाने शहर में : दिग्दर्शक अभिरुची चंद शहरी जीवनाची भावनिक, रोमँटिक आणि हृदयस्पर्शी कथा घेऊन येत आहेत. 'दो दीवाने शहर में' 20 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांची भूमिका असलेली हा रोमँटिक ड्रामा एका वेगळ्या पद्धतीने लव्हस्टोरी दाखवतो. जिथं दोन हृदये एकाच शहरात प्रेमाचा शोध घेतात.
advertisement
8/8
द केरला स्टोरी 2 : कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 2023 मध्ये अदा शर्माची भूमिका असलेल्या 'द केरला स्टोरी' या फिल्मच्या या सिक्वेलमध्ये उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हॉरर, सस्पेन्स, अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी! मोठ्या पडद्यावर जबरदस्त कॉकटेल; फेब्रुवारीत रिलीज होणाऱ्या फिल्म्सची लिस्ट