छोट्या पडद्यावरील 'जब्राट' जोडी आता रुपेरी पडदा गाजवायला सज्ज, झळकणार या सिनेमात
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Marathi Actors : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'जब्राट' जोडी आता रुपेरी पडदा गाजवायला सज्ज आहे. त्यांच्या आगामी फिल्मची चाहत्यांना उत्सुकता आहे.
advertisement
1/7

छोट्या पडद्यावरील मालिकेच्या माध्यमातून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही लोकप्रिय जोडी आता ‘जब्राट’ अशा रोमँटिक अंदाजात मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
advertisement
2/7
आयुष संजीव आणि अनुष्का सरकडे ही जोडी '36 गुणी जोडी' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेनंतर ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार? याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं.
advertisement
3/7
प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ या मराठी चित्रपटात प्रिन्स आणि निशा या व्यक्तिरेखेतून या दोघांची लव्हेबल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
advertisement
4/7
नवीन वर्षात येत्या 6 फेब्रुवारीला 'जब्राट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शानदार पोस्टर आणि चित्रपटातली ‘तू आणि मी’ हे त्यांचे रोमँटिक गाणंही प्रदर्शित झालं आहे.
advertisement
5/7
‘लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स’ असा मनोरंजनाचा जबरदस्त मसाला असणाऱ्या ‘जब्राट’ या संगीतमय चित्रपटात कॉलेज विश्वातल्या दुनियादारीच्या अत्यंत वेगळ्या पण तितक्याच भावस्पर्शी गोष्टी पहायला मिळणार आहे.
advertisement
6/7
आयुष संजीव, अनुष्का सरकटे या जोडीसोबत वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे,विक्रम आल्हाट, प्रगती कोळगे, संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर, गणेश यादव ही ज्येष्ठ कलाकार मंडळी दिसणार आहेत.
advertisement
7/7
आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे यांची '36 गुणी जोडी' ही मालिका गाजली होती. आयुष आणि अनुष्का यांची ही मालिका चांगलीच गाजली होती. आता त्यांच्या या आगामी फिल्मची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
छोट्या पडद्यावरील 'जब्राट' जोडी आता रुपेरी पडदा गाजवायला सज्ज, झळकणार या सिनेमात