रस्त्यावर पडलेली फळं खाल्ली,आजोबांचा भुकेने मृत्यू,टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजेत्या कॅप्टनची स्टोरी डोळ्यात पाणी येईल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कॅप्टन लहान असताना रस्त्यावर पडलेली फळ उचलून खायची.तसेच तिच्या आजोबांची भुकेमुळे मृत्यू झाला होता.त्यामुळे ही खेळाडू कोण आहे? जिने लहानपणी इतका संघर्ष सोसला, हे जाणून घेऊयात.
advertisement
1/8

जेव्हा एखादा खेळाडू जिंकतो, तेव्हा त्याच्या विजयाकडे सगळ्यांचे लक्ष लागते.पण त्याच्या मेहनतीकडे कुणाचेच लक्ष जात नाही.असच काहीस आता एका वर्ल्डकप विजेत्या कॅप्टनसोबत घडलं आहे.
advertisement
2/8
ही कॅप्टन लहान असताना रस्त्यावर पडलेली फळ उचलून खायची.तसेच तिच्या आजोबांची भुकेमुळे मृत्यू झाला होता.त्यामुळे ही खेळाडू कोण आहे? जिने लहानपणी इतका संघर्ष सोसला, हे जाणून घेऊयात.
advertisement
3/8
खरं तर 2 नोव्हेंबर 2025 ला भारताच्या महिला संघाने वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर बरोबर 20 दिवसांनी 23 नोव्हेंबरला महिलांच्या दृष्टिहीन संघाने टी20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला.या संघाचे कर्णधारपद टी.सी.दीपिकाने भूषवले होते, तिचा वर्ल्ड कपपर्यंतचा प्रवास अजिबात सोप्पा नव्हता
advertisement
4/8
दीपिकाच बालपण खूपच गरीबीत गेलं. घरात जेवायची पंचायत होती म्हणून ती आणि तिचे भाऊ रस्त्यावर फिरायचे.जेणेकरून केणत्या झाडावरील फळ पडलं तर त्याने आपलं पोट भरता येईल.
advertisement
5/8
दीपिकाच्या वडिलांनाही फारसा असा पगार नव्हता. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. दीपिकाचे आई-वडील शेतात मजूरी करायचे. दोघे मिळून महिन्याकाठी 800 रूपये कमवायचे.
advertisement
6/8
दीपिकाच्या वडिलांच भुकेमुळे मृत्यू झाला होता. तिचे वडील दिवसातून एकदाच जेवणाची सोय कशीबशी करू शकत होते. याच कारणामुळे डोळ्याचा अपघात झाल्यावर दीपिकाला पूर्ण उपचार मिळू शकले नाहीत, असे दीपिकाच्या भावाने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले आहे.
advertisement
7/8
दीपिका पाच महिन्यांची असताना तिने तिच्या डोळ्यात बोट घातलं होतं. त्याच्याजवळपास रुग्णालयात नव्हते. तरी ते मोठं अंतर गाठून रुग्णालयात पोहोचले.तिकडे 2 महिने उपचार पार पडले.पण पैशा अभावी दीपिकाच्या डोळ्यावर व्यवस्थित उपचार होऊ शकले नाही आणि ती दृष्टीहीन बनली,असे तिचे वडील चकथामप्पा यांनी सांगितले.
advertisement
8/8
पण दृष्टी जरी गेली असली तरी तिचे शिक्षण सूरूच राहिले.तिने घरापासून खूप लांब आपलं शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर दहावीनंतर तिने एक स्कूल ट्रस्टमध्ये शिकायला सूरूवात केली. त्यानंतर 2019 ला राष्ट्रीय अंध महिला क्रिकेट संघाची व्यवस्थापक असलेल्या शिखा शेट्टी यांनी दीपिकाला फोन करून निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास सांगितले.याच वेळी दीपिकाने आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा क्रिकेट हाच एकमेव मार्ग आहे, हे ठरवत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
रस्त्यावर पडलेली फळं खाल्ली,आजोबांचा भुकेने मृत्यू,टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजेत्या कॅप्टनची स्टोरी डोळ्यात पाणी येईल