वाढदिवसाचं 'ते' गुपित अखेर उलगडलं!
गेल्या नोव्हेंबर महिन्यात जेव्हा अमृताने तिचा ४१ वा वाढदिवस साजरा केला, तेव्हा तिने चाहत्यांना एक हिंट दिली होती. "लवकरच काहीतरी खास घेऊन येतेय," असं तिने म्हणताच सोशल मीडियावर चर्चेचा पूर आला. कोणाला वाटलं अमृता आता स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस काढणार, तर कोणाला वाटलं एखादा मोठा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट असेल. पण सरत्या वर्षाला निरोप देताना अमृताने या सस्पेन्सवरून पडदा उचलला आहे. अमृता आता स्वतःचा ब्रँड लाँच करत आहे.
advertisement
अमृताचा 'अमुल्य' साज
अमृताने तिच्या या साड्यांच्या ब्रँडला 'अमुल्य बाय अमृता' असं अतिशय सार्थ नाव दिलं आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तिच्या साड्यांच्या कलेक्शनची पहिली मोहक झलक पाहायला मिळतेय. साड्यांच्या या विश्वात अमृताचं स्वतःचं असं एक व्हिजन आहे. "माझ्या मनातून थेट तुमच्यापर्यंत... काहीतरी अमूल्य येत आहे," असं म्हणत तिने आपल्या चाहत्यांना या प्रवासात सामील करून घेतलं आहे.
ज्ञानदा रामतीर्थकरने गुपचूप उरकला साखरपुडा; कोण आहे तिचा मिस्टर परफेक्ट? आतली माहिती आली समोर
अमृताच्या साड्यांच्या निवडीबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. कोणत्याही कार्यक्रमात ती जेव्हा साडी नेसून येते, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळतात. आता अमृताचा तोच टच सर्वसामान्यांनाही अनुभवता येणार आहे.
कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव
अमृताने या नव्या व्यवसायाची घोषणा करताच मराठी चित्रपटसृष्टीतील तिचे मित्र-मैत्रिणी तिचं अभिनंदन करण्यासाठी सरसावले आहेत. स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, सई गोडबोले, सोनाली खरे आणि आशिष पाटील यांसारख्या कलाकारांनी अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
कधी होणार लाँच?
अमृताने जाहीर केल्याप्रमाणे, जानेवारी २०२६ मध्ये हा ब्रँड अधिकृतपणे सर्वत्र उपलब्ध होईल. हा ब्रँड तिच्यासाठी केवळ व्यवसाय नसून, तिच्या व्यक्तित्वाचा एक भाग आहे. "खूप वैयक्तिक, खूप खास आणि अगदी माझ्यासारखं," असं तिने या ब्रँडचं वर्णन केलंय.
