ज्ञानदा रामतीर्थकरने गुपचूप उरकला साखरपुडा; कोण आहे तिचा मिस्टर परफेक्ट? आतली माहिती आली समोर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dnyanada Ramtirthkar Engagement: ज्ञानदाचा होणारा पती नेमका कोण आहे? तो सिनेसृष्टीतील आहे की बाहेरील? या प्रश्नांनी चाहत्यांना चांगलंच सतावलं होतं.
मुंबई: सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असलेल्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतील 'काव्या' म्हणजेच आपली लाडकी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या घरात सध्या सनई-चौघड्यांचे सूर घुमू लागले आहेत. पडद्यावर काव्याच्या लग्नाची आणि प्रेमाची ओढाताण पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्ञानदाने आपल्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारासोबत साखरपुडा केला असून तिच्या आयुष्याची नवीन 'डाक्यूमेंटरी' आता सुरू झाली आहे!
सुरेख मेहंदी अन् 'H' अक्षराचा सस्पेन्स!
गेल्या दोन दिवसांपासून ज्ञानदाच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या लग्नाच्या विधींचा कल्ला पाहायला मिळत होता. सुरुवातीला चाहत्यांना वाटलं की हे कदाचित मालिकेतील एखाद्या सीनचं शूटिंग असावं. पण जेव्हा ज्ञानदाने तिच्या हातावर रंगलेल्या मेहंदीचा व्हिडिओ शेअर केला, तेव्हा चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
advertisement
या व्हिडिओमध्ये ज्ञानदाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिने हातावर सुंदर मेहंदी काढली असून त्यावर #HD असं लिहिलं आहे. यावरून तिच्या होणाऱ्या पतीचं नाव 'H' या अक्षरावरून सुरू होत असल्याचं कन्फर्म झालं. "मेहंदीने भरलेले हात... त्याने माझ्या हृदयात कायमची जागा निर्माण केली आहे," असं कॅप्शन देत तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली.
advertisement
हिरवा चुडा अन् साखरपुड्याची गोड बातमी!
केवळ मेहंदीच नाही, तर ज्ञानदाने तिच्या हातातील हिरवा चुडा मिरवत एक खास व्हिडिओ शेअर केलाय. 'ठरलं... कळवतो लवकरच' असं म्हणत तिने चाहत्यांची उत्सुकता ताणून धरली होती. पण आता हा सस्पेन्स संपला आहे. 'राजश्री मराठी'ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ज्ञानदा आणि तिचा होणारा पती एका रोमँटिक अंदाजात साखरपुडा साजरा करताना दिसत आहेत. या जोडीचा आनंद पाहून सोशल मीडियावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
advertisement
मराठी मालिकांमधून कमावली मोठी फॅन फॉलोविंग
ज्ञानदाने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. 'सख्या रे', 'शतदा प्रेम करावे', 'जिंदगी नॉट आऊट' आणि विशेषतः 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतील तिची 'अप्पू'ची भूमिका प्रचंड गाजली होती. सध्या ती 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. कामाच्या व्यापातून वेळ काढत ज्ञानदाने आता संसाराची नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
ज्ञानदाच्या पतीचं नाव आलं समोर
ज्ञानदाचा होणारा पती नेमका कोण आहे? तो सिनेसृष्टीतील आहे की बाहेरील? या प्रश्नांनी चाहत्यांना चांगलंच सतावलं होतं. ज्ञानदाने तिच्या मेहंदीमध्ये #HDLOVE असं लिहून नाव गुपित ठेवलं होतं. पण आता तिच्या मिस्टर राईटचं नाव समोर आलं आहे.
advertisement
ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव हर्षद आत्माराम आहे. हर्षद सिनेमॅटोग्राफर असून त्याने अनेक शॉर्ट फिल्म्स आणि जाहिरातींसाठी काम केलं. बंधू हा त्याने काम केलेला पहिलाच चित्रपट आहे. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी ज्ञानदा आणि हर्षदवर शुभेच्छांचा वर्षाव केला असून, आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती तिच्या लग्नाच्या शाही सोहळ्याची!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 6:57 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ज्ञानदा रामतीर्थकरने गुपचूप उरकला साखरपुडा; कोण आहे तिचा मिस्टर परफेक्ट? आतली माहिती आली समोर











