आई हिंदू ब्राह्मण, बाबा मुस्लिम; धनुषच्या मित्राने मराठमोळ्या अभिनेत्रीशी केलं लग्न, म्हणतो 'तिला जाळ्यात ओढून...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Couple Love Story : अशाही काही जोड्या आहेत, ज्या ग्लॅमरच्या या दुनियेत सतत चाहत्यांच्या नजरेसमोर नसल्या, तरीही त्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये शिकत असताना झीशान आणि रसिकाची मैत्री झाली. शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत झीशान म्हणाला, "आम्ही एनएसडीमधून बाहेर पडलो आणि लगेच लग्न केलं. खरं सांगायचं तर ती माझी पहिलीच यशस्वी प्रेमकहाणी होती. मला वाटलं की, पहिल्यांदाच एखाद्या मुलीने मला 'हो' म्हटलंय, आता ती मला पूर्णपणे ओळखण्याआधीच तिला जाळ्यात ओढून लग्न करून टाकावं, नाहीतर ती पळून जायची!"
advertisement
advertisement
त्याने आपल्या बालपणाबद्दल सांगितलं, "माझ्यासाठी हे सगळं सोपं होतं. लहानपणापासून मी आईसोबत दिवाळीच्या पूजेला बसायचो आणि आम्ही फक्त शाकाहारी जेवण खायचो. पण वडिलांच्या घरी गेलो की तिथे मस्त मांसाहारावर ताव मारला जायचा. त्यामुळे दोन संस्कृतींमध्ये कसं राहायचं, हे मला वेगळं शिकावं लागलं नाही. रसिका आणि माझ्यामध्ये धर्मापेक्षा कलेचं बंधन जास्त घट्ट होतं."
advertisement
आजच्या काळात जिथे मेंटल चीटिंग आणि दिखाऊ नात्यांची चर्चा होते, तिथे झीशानने एक खूप मोठा संदेश दिला आहे. तो म्हणतो, "जर तुम्ही केवळ सौंदर्याला भुलून किंवा 'वाह, काय दिसतेय' असा विचार करून कोणाशी लग्न केलं, तर काही काळानंतर तो चेहरा जुना वाटू लागतो. पण जर तुमच्या नात्याचा पाया मैत्री असेल, तर ते नातं आयुष्यभर टिकतं. रसिका माझ्यासाठी माझं सेफ प्लेस आहे. मला तिच्याशी खोटं बोलावं लागत नाही, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे."








