Smriti Mandhana : 'काश्मीरमधील माझी लिटिल चॅम्प...', स्मृतीचा हृदयस्पर्शी रिप्लाय, चिमुरडी चाहती भारावली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
काश्मीरमधील एका तरुण चाहतीच्या हृदयस्पर्शी संदेशाला प्रतिसाद देऊन स्मृती मानधनाने तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
मुंबई : स्मृती मानधना ही फक्त क्रिकेटपटू म्हणूनच नाही तर तिच्या मोठ्या मनासाठीही ओळखली जाते. काश्मीरमधील एका तरुण चाहतीच्या हृदयस्पर्शी संदेशाला प्रतिसाद देऊन स्मृतीने तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अंतर कितीही असलं तरी खेळामध्ये लोकांना जोडण्याची शक्ती असल्याचं स्मृतीच्या या छोट्याश्या वागणुकीने दाखवून दिलं आहे.
हा क्षण पहिल्यांदाच चित्रपट निर्माते कबीर खान यांनी शेअर केला होता, ज्यांनी काहीच दिवसांपूर्वी काश्मीरला भेट दिली होती. काश्मीरमधील काही फोटो कबीर खान यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अरू व्हॅलीमधून फिरताना कबीर खानला एक लहान मुलगी भेटली, जिने लाजून स्मृती मानधना माझी आवडती खेळाडू आहे, असं सांगितलं. कबीर खानने हा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला. तसंच स्मृती या मेसेजवर रिप्लाय देईल, अशी आशाही कबीर खानने व्यक्त केली. 'काश्मीरमध्ये माझा कॅमेरा घेऊन चालणे, मला नेहमीच जादुई क्षण देते', असं कबीर खान म्हणाला.
advertisement
'अरूमधील या लहान मुलीने स्मृती मानधना माझी आवडती खेळाडू आहे, असं सांगितलं. मला आशा आहे की स्मृतीला ही पोस्ट दिसेल. या मुलांचं मौदान हे डोंगर आहेत आणि नदी बाऊंड्री लाईन आहे. सिक्स मारलीत तर बॉल झेलम नदीतून वाहून जाईल', असं कबीर खान म्हणाला.
स्मृती मानधना श्रीलंकेविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये खेळत आहे. या व्यस्त वेळापत्रकातही स्मृतीने कबीर खानची ही पोस्ट बघितली आणि यावर रिप्लाय दिला. स्मृतीचा हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
advertisement
'अरूमधील त्याल छोट्या चॅम्पियनला कडकडीत मिठी मारा, तिला सांगा की मीही तिच्यासाठी जल्लोष करत आहे', असं स्मृती म्हणाली. स्मृतीचा हा रिप्लाय चिमुरडीसाठी आयुष्यभर आठवणीतला क्षण म्हणून राहिल.
स्मृतीचा काश्मिरी मुलीसाठीचा हा रिप्लाय अशा दिवशी आला जो स्मृतीसाठीही खास होता. रविवारी स्मृतीने श्रीलंकेविरुद्ध विशाखापट्टणममध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमध्ये 4 हजार रन पूर्ण केले. हा विक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. न्यूझीलंडच्या सुझी बेट्सनंतर हा टप्पा गाठणारी स्मृती जगातील दुसरी महिला क्रिकेटपटू आहे.
advertisement
स्मृतीने फक्त 3,227 बॉलमध्ये 4 हजार रनचा टप्पा गाठला आहे. तर बेट्सने 4 हजार रन पूर्ण करण्यासाठी 3,675 बॉल घेतले. या सामन्यात 122 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृतीने 25 बॉलमध्ये 25 रनची खेळी केली. वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 50 दिवसांनी भारतीय टीम पहिल्यांदाच मैदानात उतरली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 6:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : 'काश्मीरमधील माझी लिटिल चॅम्प...', स्मृतीचा हृदयस्पर्शी रिप्लाय, चिमुरडी चाहती भारावली!










