पुणे : नातवाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात बंडू आंदेकर त्याची भावजय माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरची सध्या जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी लक्ष्मी आंदेकर इच्छुक असून तशी परावनगी देखील न्यायालयाने दिली आहे. पुणे महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्यासाठी पुण्याच्या विशेष 'मकोका' न्यायालयाने हिरवा कंदील दर्शविल्यानंतर लक्ष्मी आंदेकरने जामीनासाठी केलेल्या अर्जावर आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात अटक आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष याचा पाच सप्टेंबर रोजी नाना पेठेत गोळ्या घालून खून करण्यात आला. या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर , सोनाली वनराज आंदेकर यांच्यासह पंधरा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. यापैकी माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला उमेदवारी मिळण्याची शक्यता असून तसे त्यांचे प्रयत्न देखील सुरू आहेत. निवडणूक लढता यावी यासाठी लक्ष्मी आंदेकरने जामिनासाठी अर्ज केला होता.
कोर्टात नेमकं काय घडलं?
लक्ष्मी आंदेकरच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने पुढे ढकलल्याने लक्ष्मी आंदेकरला मोठा धक्का बसला आहे. 26 डिसेंबर रोजी होणार लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आंदेकर कुटुंबियांनी निवडणूक लढावी यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी आंदेकरचा आयुष कोमकर हत्याप्रकरणात थेट सहभाग नाही, फक्त बंडू आंदेकर यांच्या घरात कट रचण्यात त्यांचा नाममात्रचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. या कारणास्तव एका पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
न्याय देता येत नसेल, तरी अन्याय करु नका : लक्ष्मी आंदेकर
लक्ष्मी आंदेकरला उमेदवारी मिळणार असल्याचे समोर येताच मृत आयुष कोमकरच्या आई कोमकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत राजकीय पक्षांना विनंती केली आहे की, आंदेकर कुटुंबाच्या सदस्यांना निवडणुकीत तिकीट देऊ नका. जर आम्हाला न्याय देता येत नसेल, तरी आमच्यावर अन्याय होऊ नये. आंदेकरांना निवडणुकीचे तिकीट दिले गेले तर मी आत्मदहन करण्यास तयार आहे.
हे ही वाचा :
