Google Emergency Location Service म्हणजे काय? अडचणीत कामी येईल हे फीचर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Googleने भारतातील Android यूझर्ससाठी Emergency Location Service (ELS)सुरू केली आहे. हे फीचर प्रथम कोणत्या राज्यात लाँच केले गेले आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल? चला जवळून पाहूया.
advertisement
1/6

मुंबई : गुगलने अँड्रॉइड यूझर्ससाठी एक नवीन सुरक्षा आणि इमर्जेंन्सी फीचर, इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस, लाँच केले आहे. हे फीचर फक्त कम्पॅटिबल अँड्रॉइड डिव्हाइसेससह काम करेल. ते तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पोलिस, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि अग्निशामक यांसारख्या आपत्कालीन सर्व्हिस प्रोव्हायडर्सला कॉल किंवा मेसेज करण्याची परवानगी देते आणि ते तुमचे लोकेशन देखील शेअर करेल. कोणत्या राज्याने ही सेवा प्रथम सुरू केली ते शोधूया.
advertisement
2/6
या राज्यात लाँच केलेले हे फीचर : गुगल इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस प्रथम उत्तर प्रदेशात लाँच केले गेले. हे फीचर अँड्रॉइड 6 आणि त्यावरील नवीन व्हर्जन चालवणाऱ्या डिव्हाइसेससाठी लाँच केले गेले. तसंच, ELS अॅक्टिव्ह करण्यासाठी, राज्य अधिकाऱ्यांनी ते त्यांच्या सर्व्हिससह इंटीग्रेट करावे लागेल.
advertisement
3/6
कंपनीने सांगितले की भारतातील अँड्रॉइड स्मार्टफोनवर ELS फीचर अॅक्टिव्हेट केले गेले आहे. हे फीचर यूझर्सना पोलिस, वैद्यकीय कर्मचारी आणि अग्निशामक यांसारख्या आपत्कालीन सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडून मदत घेण्यासाठी कॉल किंवा एसएमएसद्वारे त्यांचे लोकेशन शेअर करण्याची परवानगी देईल.
advertisement
4/6
हे फीचर वापरकर्त्याचे अचूक स्थान निश्चित करण्यासाठी GPS, WiFi आणि सेल्युलर नेटवर्कवरून डेटा गोळा करते आणि 50 मीटरपर्यंत अचूकतेने एखाद्या व्यक्तीचे लोकेशन निश्चित करण्यास सक्षम असल्याचा दावा करते.
advertisement
5/6
ELS फीचरसाठी लोकल वायरलेस आणि इमर्जेंसी इंफ्रास्ट्रक्चर ऑपरेटरला सपोर्ट अॅक्टिव्हेट करावं लागेल. भारतात, उत्तर प्रदेश हे अँड्रॉइड डिव्हाइससाठी ही सर्व्हिस पूर्णपणे सुरू करणारे पहिले राज्य बनले आहे.
advertisement
6/6
राज्य पोलिसांनी पर्ट टेलिकॉम सोल्युशन्सच्या सहकार्याने, ELS समर्थन आपत्कालीन क्रमांक 112 शी इंटीग्रेट केले आहे. ही एक विनामूल्य सेवा आहे जी अँड्रॉइड फोनवरून 112 डायल केल्यावरच यूझर्सचे लोकेशन ट्रॅक करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Google Emergency Location Service म्हणजे काय? अडचणीत कामी येईल हे फीचर