2026 ला फॅमिलीसाठी आता कार घ्याच! 34 किमी मायलेज, टँकसारखी सेफ अन् किंमतही कमी, अशा 3 Car
- Published by:Sachin S
Last Updated:
सेडान कारची एक वेगळी ओळख आहे. लांब पल्ल्याचा प्रवास, आरामदायक आणि स्मथू ड्रायव्हिंगसाठी सेडान कारची ओळख आहे. जर तुमचं बजेट कमी असेल तर
advertisement
1/8

भारतात सध्या जीएसटी कपातीनंतर कार आणि एसयूव्हीच्या किंमती चांगल्याच कमी झाल्या आहे. कारच्या किंमती एसयूव्ही आणि बाईकच्या किंमतीत कार सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. पण सेडान कारची एक वेगळी ओळख आहे. लांब पल्ल्याचा प्रवास, आरामदायक आणि स्मथू ड्रायव्हिंगसाठी सेडान कारची ओळख आहे. जर तुमचं बजेट कमी असेल तर मार्केटमध्ये असा काही मायलेज किंग सेडान आहे, ज्या तुम्ही आरामात विकत घेऊ शकतात.
advertisement
2/8
Tata Tigor -या यादीत पहिली येतेय ती टाटा मोटर्सची Tata Tigor. टाटा हा भारताला सेफ्टी ब्रँड म्हणून ओळखला जातो. Tata Tigor ही सगळ्या स्वस्त अशी सेडान कार आहे. या कार किंमत 5.49 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही कार पेट्रोल आणि CNG या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे.
advertisement
3/8
पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 19.2 किमी मायलेज देते. तर CNG व्हेरिएंटमध्ये 26 किमी मायलेज देते. सेफ्टीचा विचार केला तर ही टिगोरपेक्षा मजबूत आहे. या कारला Global NCAP मध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. या कारमध्ये एअरबॅग, ABS आणि मजबूत बॉडी दिली आहे. त्यामुळे फॅमिलीसाठी ही बेस्ट अशी कार आहे.
advertisement
4/8
Hyundai Aura - दक्षिण कोरियन कंपनी असलेल्या Hyundai ची Hyundai Aura ही एक स्वस्त कार आहे. Hyundai च्या या कारची 5.98 लाख एक्स शोरूम किंमत आहे. ही कार पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्यायमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
5/8
पेट्रोलमध्ये ही कार 20.5 किमी आणि CNG मध्ये 25 किमी मायलेज देते. Aura मध्ये ६ एअरबॅग दिल्या आहेत जे सगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या शिवाय कारमध्ये टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, क्रूज कंट्रोल आणि शानदार असे इंटिरिअर दिले आहे.
advertisement
6/8
Maruti Dzire - भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीची Maruti Dzire ही सगळ्यात जास्त विक्री होणारी कार आहे. या कारची सुरुवाती किंमत 6.26 लाखांपासून सुरू होते.
advertisement
7/8
Maruti Dzire चं पेट्रोल व्हेरियंट 25.71 किमी आणि CNG व्हेरियंटमध्ये 33.73 किमी इतका मायलेज देते. Maruti Dzire मध्ये 6 एअरबॅग, सनरूफ, मोठा टचस्क्रीन आणि 360 डिग्री कॅमेरा सारखे फिचर्स दिले आहे. सेफ्टीच्या बाबतीत या कारमध्ये 5-स्टार रेटिंग सुद्धा मिळाले आहे.
advertisement
8/8
जर तुमचं बजेट कमी असेल आणि सेफ्टीमध्ये चांगली कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर Tata Tigor ही एक बेस्ट आहे. तर फिचर्स चांगले पाहिजे असेल तर Hyundai Aura उत्तम आहे. जर तुम्हाला मायलेज आणि दमदार परफॉर्मेंस सारखी कार पाहिजे असेल तर Maruti Dzire ही एक बेस्ट कार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
2026 ला फॅमिलीसाठी आता कार घ्याच! 34 किमी मायलेज, टँकसारखी सेफ अन् किंमतही कमी, अशा 3 Car