TRENDING:

Bank : बँकेत कॅश काउंटरवर काच का असते? केवळ सुरक्षा हेच कारण नाही, त्यामागे दडलंय एक वेगळं शास्त्र

Last Updated:
Why glass partition are there in bank cash counters : बँकेत शिरल्यावर आपल्याला दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे तिथला तो एसीचा गारवा आणि दुसरं म्हणजे कॅश काउंटरवर असलेली ती जाड काच.
advertisement
1/8
बँकेत कॅश काउंटरवर काच का असते? केवळ सुरक्षाच नाही, त्यामागे दडलंय वेगळं शास्त्र
आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी बँकेत गेलाच असेल. अनेक गोष्टी आता डिजिटलाईज झाल्या असल्या तरी या ना त्या कारणासाठी बँकेच जावंच लागतं. मग ते पैसे काढायला असो, चेक जमा करायला असो किंवा पासबुक अपडेट करायला. बँकेत शिरल्यावर आपल्याला दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे तिथला तो एसीचा गारवा आणि दुसरं म्हणजे कॅश काउंटरवर असलेली ती जाड काच.
advertisement
2/8
कधी कधी आपल्याला खूप घाई असते, काउंटरवरचा माणूस आपलं ऐकत नाहीये असं वाटतं आणि आपल्याला वाटतं, "अरे यार! ही काच नसती तर डायरेक्ट बोलता आलं असतं." अनेकदा आपण त्या काचेच्या छोट्या होलातून ओरडून बोलण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनात येतं की, ही काच फक्त चोरी रोखण्यासाठी किंवा सुरक्षेसाठी लावली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? या काचेमागे केवळ सुरक्षा हेच एकमेव कारण नाही. यामागे काही तांत्रिक आणि मानसशास्त्रीय कारणंही आहेत, जी वाचून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.
advertisement
3/8
1. सुरक्षे पलीकडचं कारण: Concentrationकॅश काउंटरवर बसलेली व्यक्ती एकावेळी लाखो रुपयांचा हिशोब करत असते. एक छोटीशी चूक आणि मोठा आर्थिक फटका बसू शकतो. बँकेत लोकांची सतत वर्दळ असते, कोणी ओरडतं, तर कोणी मध्येच प्रश्न विचारतं. ही काच एक प्रकारे 'साऊंड बॅरियर' (आवाज रोखणारा भिंत) म्हणून काम करते. यामुळे कॅशियरला बाहेरील गोंधळाचा त्रास होत नाही किंवा डिस्टर्ब होत नाही आणि तो पैशांची मोजणी बिनचूक करू शकतो.
advertisement
4/8
2. आरोग्याचं रक्षण (Health & Hygiene)बँकेत दिवसाला शेकडो लोक येतात. तिथे वेगवेगळ्या अनोळखी लोकांशी संभाष होतं बोलताना नकळत उडणारे थुंकीचे थेंब किंवा हवेतून पसरणारे जंतू थेट कॅशियरपर्यंत पोहोचू नयेत, यासाठी ही काच महत्त्वाची असते. कोरोना काळानंतर या काचेचं महत्त्व आपल्याला अधिकच उमजलं आहे. नोटांवर आधीच खूप बॅक्टेरिया असतात, त्यात समोरासमोरच्या व्यक्तीच्या श्वासावाटे होणारा संसर्ग टाळण्यासाठी ही काच कवच म्हणून काम करते.
advertisement
5/8
3. मानशास्त्रीय अंतर (Psychological Distance)जेव्हा दोन व्यक्तींमध्ये एक पारदर्शक भिंत असते, तेव्हा समोरच्या व्यक्तीची वर्तणूक आपोआप शिस्तबद्ध होते. ही काच ग्राहकाला जाणीव करून देते की हे एक प्रतिबंधित क्षेत्र (Restricted Area) आहे. यामुळे लोक काउंटरमध्ये डोकावण्याचा किंवा कॅशियरच्या कामात विनाकारण व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत नाहीत.
advertisement
6/8
4. कागदपत्रांची सुरक्षितताबँकेच्या काउंटरवर नुसती कॅश नसते, तर महत्त्वाचे फॉर्म्स, स्टॅम्प्स आणि अनेक पावत्या असतात. पंख्याच्या हवेने किंवा ग्राहकाच्या हातातल्या बॅगेच्या धक्क्याने हे कागद उडून जाऊ नयेत, यासाठी ही काच एक संरक्षक भिंत म्हणून उभी असते.
advertisement
7/8
चूक सुधारण्यासाठी वेळ मिळतोकधी कधी घाईघाईत आपण काहीतरी बोलतो आणि नंतर आपल्याला आपली चूक उमजते. कॅशियर आणि ग्राहक यांच्यात ही काच असल्याने दोघांनाही संवादात एक प्रकारची स्पष्टता मिळते. जरी आपल्याला त्या छोट्या छिद्रातून बोलताना त्रास होत असला, तरी तो त्रास आपल्याच पैशांच्या सुरक्षेसाठी असतो.
advertisement
8/8
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बँकेत जाल आणि त्या काचेच्या पलीकडे असलेल्या कॅशियरकडे पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा की ती काच केवळ त्याला तुमच्यापासून वाचवण्यासाठी नाही, तर तुमच्या पैशांचा हिशोब अचूक राहवा यासाठी लावलेली आहे. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांनाही नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Bank : बँकेत कॅश काउंटरवर काच का असते? केवळ सुरक्षा हेच कारण नाही, त्यामागे दडलंय एक वेगळं शास्त्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल