Dnyanada Ramtirthkar: 'काव्या'ला खऱ्या आयुष्यात मिळाला तिचा 'पार्थ'! गुपचूप उरकला साखरपुडा, कशी जुळली ज्ञानदा-हर्षदची जोडी?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dnyanada Ramtirthkar Engagement: एका व्हिडिओमध्ये ज्ञानदाने 'ठरलं... कळवतो लवकरच' असं लिहित चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. पण अखेर हा सस्पेन्स संपला असून तिने गुपचूप साखरपुडा उरकून घेतल्याचं स्पष्ट झालंय.
advertisement
1/9

मुंबई: २०२५ हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी खऱ्या अर्थाने लगीनघाईचं वर्ष ठरलंय. प्राजक्ता गायकवाड-शंभूराज खुटवड असो, सोहम बांदेकर-पूजा बिरारी जोडी असो किंवा सोशल मीडिया गाजवणारा सूरज चव्हाण; एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी बोहोल्यावर चढले.
advertisement
2/9
पण चाहत्यांना वाटलं होतं की आता हा लग्नाचा हंगाम थांबलाय, तेव्हाच घराघरात पोहोचलेली 'काव्या' म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने एक गुपित उघड करत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
advertisement
3/9
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील लाडकी 'अप्पू' असो किंवा सध्याच्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील 'काव्या', ज्ञानदाने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.
advertisement
4/9
गेल्या दोन दिवसांपासून ज्ञानदाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाच्या हालचालींचे संकेत मिळत होते. कधी हिरवा चुडा, तर कधी मेहंदीने माखलेले हात! एका व्हिडिओमध्ये तिने 'ठरलं... कळवतो लवकरच' असं लिहित चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. पण अखेर हा सस्पेन्स संपला असून ज्ञानदाने गुपचूप साखरपुडा उरकून घेतल्याचं स्पष्ट झालंय.
advertisement
5/9
ज्ञानदाच्या हातावर ज्याच्या नावाचा रंग चढला आहे, तो आहे हर्षद आत्माराम. आता हा हर्षद नक्की कोण? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. ज्ञानदा कॅमेऱ्यासमोर अभिनय करते, तर तिचा होणारा पती हर्षद हा कॅमेऱ्यामागील जादूगार आहे.
advertisement
6/9
हर्षद व्यवसायाने DOP आहे. त्याने आजवर अनेक नामांकित जाहिराती आणि चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली आहे. विशेष म्हणजे, त्याने स्वतंत्रपणे काम केलेला 'बंधू' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. थोडक्यात सांगायचं तर, खऱ्या आयुष्यात 'काव्या' पडद्यामागच्या जादूगाराच्या प्रेमात पडली आहे.
advertisement
7/9
अनेकांना वाटलं असेल की हे लग्न अरेंज मॅरेज आहे की काय? तर त्याचं उत्तर 'नाही' असं आहे. ज्ञानदा आणि हर्षदची मैत्री आजची नसून तब्बल ६ वर्षांपूर्वीची आहे. २०१९ मध्ये ज्ञानदाने हर्षदसोबतचा एक फोटो शेअर केला होता, जो आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
advertisement
8/9
तेव्हापासूनच या दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुटले असावेत, असा अंदाज आता चाहते बांधत आहेत. दीर्घकाळ मैत्री निभावल्यानंतर आता या जोडीने आपल्या नात्याला लग्नाचं नाव देण्याचं ठरवलं आहे.
advertisement
9/9
ज्ञानदाने तिच्या पोस्टमध्ये #HD हा हॅशटॅग वापरला होता, ज्याचा अर्थ 'हर्षद-ज्ञानदा' असा आहे. या गोड जोडीला पाहून मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांसह चाहत्यांनीही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. आता प्रतीक्षा आहे ती या जोडीच्या लग्नाच्या तारखेची! ज्ञानदा लवकरच बोहोल्यावर चढणार असून तिच्या नव्या प्रवासासाठी सर्वजण आतुर झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dnyanada Ramtirthkar: 'काव्या'ला खऱ्या आयुष्यात मिळाला तिचा 'पार्थ'! गुपचूप उरकला साखरपुडा, कशी जुळली ज्ञानदा-हर्षदची जोडी?