Astrology: लढत राहिलो, आशा सोडली नव्हती! या राशींचे आता दिवस पालटणार; नशिबानं भाग्याची साथ
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, December 24, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशीभविष्य सांगितलं जातं. ग्रहस्थितीनुसार राशींवर कसा परिणाम असेल, ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
advertisement
1/12

मेषमेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा आव्हानात्मक असू शकतो. आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल तुम्ही जरा जास्त विचार करताना दिसाल. लोकांशी बोलताना काही लहानसहान अडचणी येऊ शकतात आणि त्याचा मनावर ताण येऊ शकतो. नात्यांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी वाटू शकते. प्रिय व्यक्तींशी बोलताना थोडं जपून बोला. आज मन थोडं अस्वस्थ राहू शकतं, पण भावनिक संतुलन ठेवणं खूप गरजेचं आहे. संयम ठेवा आणि शक्य तितका सकारात्मक विचार करा. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा ठेवलात तर गैरसमज दूर होतील. आजच्या अडचणी तुम्हाला वेगळ्या दृष्टीने विचार करायला शिकवतील.लकी अंक: 4लकी रंग: आकाशी निळा
advertisement
2/12
वृषभआजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आणि सकारात्मक असेल. मन स्थिर राहील आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. घरच्यांसोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने मनाला शांती मिळेल. आज तुमची विचार करण्याची पद्धत आणि सर्जनशीलता चांगली दिसेल. एखादी कल्पना मांडताना लोक तुमचं ऐकून घेतील. भावना व्यक्त करताना संकोच करू नका. नाती अधिक घट्ट होतील आणि आपुलकी वाढेल. संवादात स्पष्टपणा ठेवल्याने प्रेमात अधिक समज येईल. एकंदरीत आजचा दिवस नवीन योजना आखण्यासाठी आणि स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी चांगला आहे.लकी अंक: 11लकी रंग: नेव्ही ब्लू
advertisement
3/12
मिथुनआजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी थोडा कठीण जाऊ शकतो. काही कारणांमुळे मनावर ताण जाणवू शकतो. आजूबाजूचं वातावरण थोडं नकारात्मक वाटू शकतं. त्यामुळे नात्यांमध्ये संवाद साधणं अवघड जाऊ शकतं. अशावेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. मनातल्या गोष्टी कुणाशी तरी शेअर करा. सगळं स्वतःपुरतं ठेवू नका. मित्र किंवा घरच्यांशी बोलल्याने मन हलकं होईल. लक्षात ठेवा, अडचणी कायमच्या नसतात.लकी अंक: 1लकी रंग: हिरवा
advertisement
4/12
कर्ककर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूपच छान असणार आहे. तुमची भावनिक समज आज चांगली काम करेल. घरच्यांसोबत आणि मित्रांसोबत घालवलेला वेळ मन आनंदी करेल. आज तुम्हाला तुमच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील. त्यामुळे नाती अधिक घट्ट होतील. तुमची आपुलकी आणि समजूतदारपणा इतरांना आधार देईल. आज नवीन, आनंद देणाऱ्या गोष्टी करायला वेळ मिळू शकतो. नात्यांसाठी हा दिवस खूप चांगला आहे.लकी अंक: 3लकी रंग: गडद हिरवा
advertisement
5/12
सिंहआजचा दिवस काही अडचणी घेऊन येऊ शकतो. लोकांशी वागताना थोडं अस्वस्थ वाटू शकतं. नात्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना संयम ठेवा. भावना सांभाळून व्यक्त करा. आज अपेक्षा जास्त ठेवल्यामुळे निराशा येऊ शकते. त्यामुळे समजूतदारपणे वागणं गरजेचं आहे. प्रामाणिकपणा आणि विश्वास यामुळे नाती टिकून राहतील. दिवसाच्या शेवटी गोष्टी हळूहळू स्पष्ट होतील.लकी अंक: 9लकी रंग: काळा
advertisement
6/12
कन्याआज कन्या राशीच्या लोकांना थोडी अस्वस्थता जाणवू शकते. मनावर काळजीचा भार राहू शकतो. निर्णय घेताना गोंधळ उडण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये छोटे अडथळे येऊ शकतात, पण संयम ठेवलात तर सगळं सुरळीत होईल. बोलताना कठोर शब्द टाळा. सध्याच्या अडचणी तुम्हाला अधिक मजबूत बनवतील. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा.लकी अंक: 8लकी रंग: लाल
advertisement
7/12
तूळआजचा दिवस खूप सकारात्मक आणि सुखद आहे. लोकांशी संवाद चांगला होईल. प्रियजनांसोबत जास्त वेळ घालवता येईल. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नात्यांमध्ये नवीनपणा जाणवेल. समजूतदारपणा आणि सहकार्य वाढेल. आजूबाजूचं वातावरण आनंदी राहील. या दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या.लकी अंक: 5लकी रंग: पांढरा
advertisement
8/12
वृश्चिकआजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. तुमच्या भावना तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. घरच्यांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. एखाद्या नात्यात गैरसमज असेल तर आज तो बोलून सोडवता येईल. प्रामाणिकपणा उपयोगी पडेल. नवीन आठवणी तयार होतील. नात्यांमध्ये सकारात्मक बदल जाणवतील.लकी अंक: 7लकी रंग: जांभळा
advertisement
9/12
धनुआजचा दिवस वेगवेगळे अनुभव देणारा असेल. काही अडचणी येऊ शकतात, पण त्यातून शिकायला मिळेल. थोडी निराशा वाटू शकते, पण धैर्य ठेवा. शांत राहून परिस्थिती समजून घ्या. प्रिय व्यक्तींशी मोकळेपणाने बोला. यामुळे मन हलकं होईल आणि नात्यांमध्ये जवळीक वाढेल.लकी अंक: 6लकी रंग: पिवळा
advertisement
10/12
मकरआजचा दिवस थोडा कठीण जाऊ शकतो. मनावर ताण येण्याची शक्यता आहे. अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. लोकांशी बोलताना जपून बोला, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास परिस्थिती हाताळता येईल. स्वतःला वेळ द्या आणि सकारात्मक गोष्टींमध्ये मन गुंतवा.लकी अंक: 2लकी रंग: गुलाबी
advertisement
11/12
कुंभआजचा दिवस खूप उत्साहवर्धक आहे. तुमची कल्पकता आणि विचार मांडण्याची पद्धत लोकांना आवडेल. नवीन ओळखी होतील आणि सामाजिक जीवन सक्रिय राहील. नवीन योजना आखण्यासाठी आणि काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आत्मविश्वास ठेवा आणि पुढे चला.लकी अंक: 5लकी रंग: नारंगी
advertisement
12/12
मीनआजचा दिवस आनंद देणारा आणि सकारात्मक आहे. तुमची संवेदनशीलता आणि सर्जनशीलता आज खुलून येईल. लोकांशी भावनिक जवळीक वाढेल. संवादातून नवीन संधी मिळू शकतात. अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. आजची सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवातीचे संकेत देईल.लकी अंक: 10लकी रंग: निळा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: लढत राहिलो, आशा सोडली नव्हती! या राशींचे आता दिवस पालटणार; नशिबानं भाग्याची साथ