Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, थंडीची 'त्सुनामी' येणार; हवामान खात्याचा अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील तापमानात चढउतार होत आहेत. पाहुयात 24 डिसेंबर रोजी राज्यात हवामान कसे असेल.
advertisement
1/7

राज्यातील तापमानात चढउतार होत आहेत. मागील दोन-तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागांत थंडी वाढल्याचे दिसून आले. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातील थंडीचा कडाका कायम आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील किमान तापमानात देखील घट झाली आहे. पाहुयात 24 डिसेंबर रोजी राज्यात हवामान कसे असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात कोरडे हवामान पहायला मिळेल. तर किमान तापमानात 1 अंश सेल्सिअसने घट होईल. मुंबई कमाल तापमान 17 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 32 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
3/7
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे. पुणे शहरात किमान तापमान 9 अंश सेल्सिअस राहील. तर सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील गारठा पहायला मिळेल.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात मागील दोन दिवस शीतलहर अनुभवायला मिळाली. आता मात्र किमान तापमानात किंचित वाढ झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र तरीदेखील थंडीचा कडाका कायम आहे. नाशिक आणि जळगावमध्ये 10 अंश सेल्सिअस किमान तापमान राहील.
advertisement
5/7
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील जिल्ह्यात काहीसे ढगाळ हवामान असल्याने गारठा काहीसा कमी झाला होता. परंतु आता पुन्हा एकदा थंडावा वाढणार आहे. मराठवाड्यात किमान तापमान 9 ते 11 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
6/7
विदर्भात देखील गारवा कायम आहे. नागपूरमध्ये किमान तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. पुढील काही दिवस विदर्भात गारवा असाच कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, यंदा राज्यातील सर्वच विभागात चांगली थंडी पहायला मिळत आहे. ही थंडी रब्बी हंगामातील पिकासाठी पोषक आहे. तसेच नागरिकांना देखील आरोग्यदायी आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची मात्र काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, थंडीची 'त्सुनामी' येणार; हवामान खात्याचा अलर्ट