Smriti Mandhanaची 'बेस्ट फ्रेंड'च आता विरोधात, श्रीलंकेविरूद्ध टी20 मालिकेदरम्यान मिळाली मोठी जबाबदारी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना सध्या श्रीलंकेविरूद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत व्यस्त आहे. या मालिके दरम्यान स्मृतीच्या बेस्ट फ्रेंडला गुडन्यूज मिळाली आहे.
advertisement
1/8

टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना सध्या श्रीलंकेविरूद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत व्यस्त आहे. या मालिके दरम्यान स्मृतीच्या बेस्ट फ्रेंडला गुडन्यूज मिळाली आहे.
advertisement
2/8
स्मृती मानधनाची ही तिच बेस्ट फ्रेंड आहे.जी स्मृतीच्या कठीण काळात तिच्यासोबत उभी राहिली होती. विशेष म्हणजे तिने स्मृतीसाठी बिग बॅश सारखी आंतरराष्ट्रीय लीग खेळण्यासही नकार दिला होता.
advertisement
3/8
खंर तर आजपासून 16 दिवसांनी वुमेन्स प्रिमियर लीगला सुरूवात होणार आहे. या लीगसाठी दिल्ली कॅपिटल्सने आपला कॅप्टन बदलला आहे. दिल्ली कॅपिटल्सने भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जची कर्णधार म्हणून निवड केली आहे. त्यामुळे स्मृतीच्या बेस्ट फ्रेंडला खुशखबर मिळाली आहे.
advertisement
4/8
जेमीमा ही तिच खेळाडू आहे जिने आयसीसी वुमेन्स वर्ल्डकपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात, तिने 339 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार नाबाद 127 धावा केल्या.
advertisement
5/8
दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार म्हणून नियुक्ती होणे हा एक पूर्ण सन्मान आहे आणि या संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी मालक आणि सपोर्ट स्टाफचा मनापासून आभारी आहे," असे दिल्लीचे कॅप्टन बनल्यानंतर जेमीमा रॉड्रिग्जने म्हटले आहे.
advertisement
6/8
"वर्ल्ड कप जिंकणे हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खरोखरच स्वप्नवत वर्ष होते आणि आता मला अशा फ्रँचायझीमध्ये ही अद्भुत संधी मिळाली आहे ज्याने WPL च्या पहिल्या हंगामापासूनच माझ्या हृदयात खूप खास स्थान मिळवले आहे,असेही जेमीमा म्हणाली आहे.
advertisement
7/8
जेमी पहिल्या WPL लिलावात ती फ्रँचायझीची पहिली निवड होती आणि आतापर्यंत तिने 27 सामने खेळले आहेत. त्या सामन्यांमध्ये तिने 139.67 च्या स्ट्राइक रेटने 507 धावा केल्या आहेत.
advertisement
8/8
गेल्या महिन्याच्या लिलावापूर्वी फ्रँचायझीने सोडलेल्या मेग लॅनिंगकडून तिने कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.तसेच दिल्ली कॅपिटल्स 10 जानेवारी रोजी नवी मुंबईत मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांच्या WPL 2026 मोहिमेची सुरुवात करेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhanaची 'बेस्ट फ्रेंड'च आता विरोधात, श्रीलंकेविरूद्ध टी20 मालिकेदरम्यान मिळाली मोठी जबाबदारी