BCCIची सक्ती, नाईलाजाने विराट रोहितला खेळावं लागणार, Vijay Hazare Trophy खेळण्याचे किती पैसे मिळणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
देशांतर्गत क्रिकेटमध्ये उद्या 24 डिसेंबर 2025 पासून सूरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार आहेत.
advertisement
1/7

रोहित शर्मा मुंबईच्या टीमकडून ही स्पर्धा खेळणार आहे. आणि तो मुंबईकडून सुरूवातीचे दोन सामने खेळणार आहे. याबाबतची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिली आहे. त्यामुळे तो शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वात जयपूरमध्ये खेळताना दिसणार आहे.
advertisement
2/7
विराट कोहली दिल्लीच्या संघातून खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीने सूरूवातीच्या सामन्यांसाठी आपण उपलब्ध असल्याची माहिती दिली होती. दिल्ली अॅन्ड डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनने त्याला सुरूवातीच्या सामन्यासाठी संघात सामील केले आहे.
advertisement
3/7
दरम्यान दिल्ली संघाचा कर्णधार विकेटकिपर,बॅटर रिषभ पंत आहे, तर उप कर्णधार आयुष बदोनी आहे. दिल्ली हे सामने बंगळुरूत खेळवले जाणार आहेत.
advertisement
4/7
विजय हजारे ट्रॉफी 24 डिसेंबरपासून सुरू होईल. लीग स्टेज 8 जानेवारी 2026 पर्यंत चालेल,त्यानंतर नॉकआउट सामने आणि 18 जानेवारी रोजी अंतिम सामना होईल.
advertisement
5/7
विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळाडूंना त्यांच्या मागील लिस्ट ए अनुभवाच्या आधारावर प्रति सामना शुल्क मिळते.41 किंवा त्याहून अधिक लिस्ट ए सामने खेळलेल्या खेळाडूंना 60,000, 21-40 सामने खेळलेल्यांना 50,000 आणि 0-20 सामने खेळलेल्यांना 40,000 मिळतात. राखीव खेळाडूंना या रकमेच्या निम्मे पैसे दिले जातात.
advertisement
6/7
विराट कोहलीने 40 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत, त्यामुळे त्याला प्रति सामना 60,000 मिळतील. तो दिल्लीसाठी तीन सामने खेळू शकतो. विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकूण 1.80 लाख कमवू शकतो.
advertisement
7/7
रोहित शर्माचे प्रति सामना शुल्क विराटच्या सारखेच असेल. माजी भारतीय कर्णधार मुंबईसाठी दोन सामने खेळू शकतो, या स्पर्धेत 1.20 लाख कमावू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
BCCIची सक्ती, नाईलाजाने विराट रोहितला खेळावं लागणार, Vijay Hazare Trophy खेळण्याचे किती पैसे मिळणार?