280 कोटींची संपत्ती, महागडी हॉटेल्स सोडून मुंबईच्या या रस्त्यावरचा वडापाव खातो अभिषेक बच्चन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिषेक बच्चन आज कोट्यवधींचा मालक आहे. पण महागडी रेस्टॉरंट सोडून तो मुंबईतील फेमस रस्त्यांवरील वडापाव खाण्यास प्राधान्य देतो.
advertisement
1/7

बच्चन कुटुंबातील 'ज्युनियर बी' म्हणजे अभिषेक बच्चन. आज तो त्याचा 50 वा बर्थडे सेलिब्रेट करतोय. अभिनयासोबतच अभिषेक त्याच्या सिंपल लाइफस्टाइलसाठीही ओळखला जातो. असं असलं तरी अभिषेक कमालीचा फूडी आहे. खाण्यासाठी तो एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतो.
advertisement
2/7
अमिताभ बच्चन यांचा मुलगा, त्यात त्याची 280 कोटीहून अधिक संपत्ती. आता खायचं म्हटल्यावर तो महागड्या रेस्टॉरंटमध्येच जाणार ना... तुम्हाला असं वाटत असेल तर पूर्णपणे खरंही नाहीये. कारण अभिषेकला महागड्या हॉटेल्सपेक्षा मुंबईच्या रस्त्यावर मिळणाऱ्या चटपटीत पदार्थ जास्त आवडतात. महाराष्ट्रीय पदार्थला त्याला विशेष आवडतात.
advertisement
3/7
अभिषेक बच्चनने नुकत्याच एका फूड ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत आपल्या खाण्याच्या आवडींबद्दल सांगितलं. अभिषेकला मिसळ फ्राय खूप आवडते. मिसळ खाण्यासाठी तो ठाण्याच्या प्रसिद्ध मामलेदार मिसळला जातो.शूटिंगदरम्यान तो अनेकदा सकाळच्या नाश्त्यासाठी तो ही मिसळच खातो.
advertisement
4/7
मुंबईची ओळख असलेला वडापावही अभिषेकला खूप आवडतो. पण को खाण्यासाठी तो जुहूवरून दादरला येतो. दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील कीर्तीचा वडापाव आणि विले पार्ले येथील मिठीबाई कॉलेजसमोर मिळणारा वडापावही त्याला आवडतो.
advertisement
5/7
स्ट्रीट फूडसोबतच अभिषेकने आपल्या ब्रेकफास्ट रूटीनबद्दलही सांगितलं. सकाळी गरमागरम पावसोबत अंडा भुर्जी फ्राय हा त्याचा आवडता आणि नेहमीचा नाश्ता आहे.
advertisement
6/7
मोठा स्टार आणि करोडोची संपत्ती असूनही अभिषेक बच्चनचा साधेपणा अनेकांना भावतो. महागड्या रेस्टॉरंट्सऐवजी मुंबईच्या रस्त्यांवरील पदार्थ खायला त्याला आवडतात. अभिषेक त्याच्या या देसी स्टाइलमुळे चाहत्यांना आणखी आवडतो..
advertisement
7/7
CAknowledge.com च्या रिपोर्टनुसार अभिषेक बच्चन 280 कोटीहून अधिक संपत्तीचा मालक आहे. फक्त अभिनयच तर अभिषेक बच्चन त्याच्या प्रोडक्शनचं कामही पाहतो. त्याची महिन्याची कमाई सुमारे 2 कोटी रुपये असून वर्षभरात ते 24 कोटी रुपयांहून अधिक कमाई करतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
280 कोटींची संपत्ती, महागडी हॉटेल्स सोडून मुंबईच्या या रस्त्यावरचा वडापाव खातो अभिषेक बच्चन