TRENDING:

Hemlata Patkar: बिल्डरच्या मुलाला अडकवलं, 10 कोटी मागितले, खंडणी प्रकरणात अडकलेली अभिनेत्री हेमलता पाटकर आहे तरी कोण?

Last Updated:
Who is actress Hemlata Patkar: सध्या अर्चना पाटकर यांचं नाव अशा प्रकरणात घेतलं जातंय, ज्याचा त्यांच्याशी काहीच संबंध नाही. त्यांच्या सुनेच्या एका धक्कादायक कृत्यामुळे सध्या सिनेसृष्टीत मोठी खळबळ माजली आहे.
advertisement
1/8
खंडणी प्रकरणात अडकलेली अभिनेत्री हेमलता पाटकर आहे तरी कोण?
मुंबई: स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका पाहणाऱ्या प्रत्येक घराघरात 'कांचन आजी' म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर हे नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. कडक शिस्त आणि घर सांभाळणारी आजी म्हणून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.
advertisement
2/8
पण, सध्या अर्चना पाटकर यांचं नाव अशा प्रकरणात घेतलं जातंय, ज्याचा त्यांच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीशी काहीच संबंध नाही. त्यांच्या सुनेच्या एका धक्कादायक कृत्यामुळे सध्या सिनेसृष्टीत मोठी खळबळ माजली आहे.
advertisement
3/8
मुंबईत एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप अर्चना पाटकर यांची सून हेमलता पाटकर-बाणे आणि तिची मैत्रीण अमरिना झवेरी यांच्यावर करण्यात आला आहे.
advertisement
4/8
एका पार्टीत लेझर लाईट्सवरून झालेला वाद मिटवण्यासाठी या दोघींनी चक्क खंडणी मागितली. बराच काळ बार्गेनिंग चालल्यानंतर हा आकडा ५.५ कोटींवर निश्चित झाला. मात्र, बिल्डरने पोलिसांत धाव घेतली आणि मुंबई गुन्हे शाखेने सापळा रचला. दीड कोटी रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना या दोघींना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं.
advertisement
5/8
हेमलता पाटकर हे नावही मनोरंजन विश्वासाठी नवीन नाही. अर्चना पाटकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत हेमलतानेही काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती केवळ अभिनेत्रीच नाही, तर एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे.
advertisement
6/8
तिला पेंटिंग आणि स्केचेसची प्रचंड आवड असून ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ग्लॅमरस लाईफस्टाईल जगणाऱ्या या अभिनेत्रीला आता चक्क कोठडीची हवा खावी लागत आहे.
advertisement
7/8
हे वृत्त बाहेर येताच अर्चना पाटकर यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचू लागला. अनेक ठिकाणी त्यांचा फोटो आणि नाव वापरलं जाऊ लागलं. अखेर व्यथित झालेल्या अर्चना यांनी फेसबुकवर आपली बाजू मांडली.
advertisement
8/8
त्या म्हणतात, "मी ४० वर्षांपासून अत्यंत प्रामाणिकपणे या क्षेत्रात काम करत आहे. हेमलता बाणे हिने जे केलं, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. माझा मुलगा गेल्या ४ वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झाला असून त्यांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा वापर या प्रकरणात करू नका."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hemlata Patkar: बिल्डरच्या मुलाला अडकवलं, 10 कोटी मागितले, खंडणी प्रकरणात अडकलेली अभिनेत्री हेमलता पाटकर आहे तरी कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल