TRENDING:

Bharat Ganeshpure : जिला सांगितलं 'तूच नकार दे' तिच्याशीच दोन वेळा केलं लग्न, भारत गणेशपुरेची हटके Love Story

Last Updated:
Bharat Ganeshpure Love Story : व्हाराडी भाषेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हटक्या अभिनयासारखीच त्यांनी हटके लव्ह स्टोरीही आहे. जिला लग्नासाठी नकार द्यायला सांगितला तिच्याशीच दोनदा केलं लग्न.
advertisement
1/10
जिला सांगितलं 'तूच नकार दे' तिच्याशीच दोन वेळा केलं लग्न, भारतची हटके Love Story
चला हवा येऊ द्या या शोमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विदर्भाच्या मातीतला अस्सल कलाकार म्हणजे भारत गणेशपुरे. आपल्या अस्सल व्हराडी भाषेनं भारत यांनी महाराष्ट्राची मनं जिंकली. व्हाराडी त्यांच्यामुळे अनेकांना समजली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
advertisement
2/10
चला हवा येऊ द्या, फु बाई फु सारखे कॉमेडी शो तसंच अनेक मालिका आणि सिनेमांमधून आपल्या दर्जेदार अभिनयानं भारत गणेशपुरे घराघरात ओळखले गेले.
advertisement
3/10
भारत यांच्या आतापर्यंतच्या प्रवासात त्यांच्या आई-वडिलांइतकीच त्यांच्या बायकोचीही त्यांना खूप मोठा साथ लाभली आहे. भारत यांची लव्ह स्टोरी देखील त्यांच्यासारखीच भन्नाट आहे. ज्या मुलीला त्यांनी लग्नासाठी नकार दे असं सांगितलं होतं तिच्याशीच त्यांनी दोन वेळा लग्न केलं.
advertisement
4/10
भारत गणेशपुरे यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. मुंबईत येऊन अभिनय क्षेत्रात नाव कमवायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पण त्यांच्या घरातून त्यांना असं करण्यास परवानगी नव्हती. वडिलांना तयार करणं हा त्यांच्यासाठी टास्क होता.
advertisement
5/10
त्यावेळी भारत यांचं एग्रीकल्चरचं शिक्षण झालं होतं. MPSC परीक्षा देण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली. त्यांच्या आईने त्यांच्या हातात 300 रुपये देऊन त्यांना मुंबईत पाठवलं होतं. ते मित्रांबरोबर मुंबईत राहू लागले. सुरुवातीच्या काळात मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांनी काम केलं.
advertisement
6/10
त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न करण्याचं ठरवलं. एक मुलगी पाहिली. भारत मुलीला भेटायला गेले आणि तिला सद्य परिस्थिती सांगितली. "तूच मला नकार दे. कारण मी या क्षेत्रात काम करतो, त्यामुळे तुला हवं तसं जगता येणार नाही. अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल."
advertisement
7/10
भारत पुढे म्हणाले, "माझी एक मालिका सुरू आई, मी मालिकेत काम करतोय म्हणून मला भावनेच्या भरात होकार देऊ नको", असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. पण तरीही त्या मुलीनं भारत यांना होकार दिला.
advertisement
8/10
अंजली गणेशपुरे असं भारत यांच्या पत्नीचं नाव आहे.त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासात अंजली यांनी त्यांना मोलाची साथ दिली. दोघांना दोन मुलंही आहेत. भारत यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांना पत्नीची खंबीर साथ मिळत आली आहे.
advertisement
9/10
[caption id="attachment_1457818" align="aligncenter" width="750"] ज्या मुलीला तू लग्नासाठी नकार दे असं सांगितलं होतं त्याच मुलीशी भारत यांनी एकदा नाही तर दोनदा लग्न केलं होतं. यामागे एक खास कारण होतं.</dd> <dd>[/caption]
advertisement
10/10
लोकमतच्या वृत्तानुसार, चला हवा येऊ द्या परदेश दौऱ्यावर असताना गणेश यांना सौम्य अटॅक आला होता. त्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. ज्योतिषांना हात दाखवल्यानंतर त्यांनी त्यांना पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे भारत आणि अंजली यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. हळदीपासून सगळ्या विधी त्यांनी केल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bharat Ganeshpure : जिला सांगितलं 'तूच नकार दे' तिच्याशीच दोन वेळा केलं लग्न, भारत गणेशपुरेची हटके Love Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल