TRENDING:

'धुरंधर' पेक्षाही 'खतरनाक अवतार'! रणवीर सिंगची नवीन फिल्म, काय आहे स्टोरी?

Last Updated:
Dhurandhar Ranveer Singh Film :  रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' ने 1500 कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला आहे. दरम्यान त्याच्या आगामी फिल्म्सबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यापैकीच ही एक फिल्म ज्यात त्याचा आणखी खतरनाक अवतार पाहायला मिळणार आहे.
advertisement
1/9
'धुरंधर' पेक्षाही 'खतरनाक अवतार'! रणवीर सिंगची नवीन फिल्म, काय आहे स्टोरी?
अभिनेता रणवीर सिंगच्या धुरंधर आणि धुरंधर 2 या दोन्ही फिल्मने अक्षरश: वादळ आणलं. फिल्ममधील रणवीरचा लूकही सगळ्यांना आवडला. आता हाच धुरंधर रणवीर आता एका नव्या अवतारात दिसणार आहे. जो धुरंधरपेक्षाही खतरनाक असल्याचं सांगितलं जातं आहे.
advertisement
2/9
धुरंधरच्या यशानंतर रणवीर सिंगची नव्या फिल्म्सची चर्चा होते. त्यापैकीच ही एक फिल्म, प्रलय असं या फिल्मचं नाव. रणवीर सिंगच्या रांगेत असलेल्या फिल्म्सपैकी सर्वाधिक चर्चेत असलेली ही फिल्म
advertisement
3/9
ही फिल्म ब्लाइंडनेस या पोर्तुगीज कादंबरीवर आधारीत असल्याचं म्हटलं जातं होतं. पण फिल्मचे दिग्दर्शक जय मेहताचे वडील आणि प्रसिद्ध निर्माते हंसल मेहता यांनी हे नाकारलं आहे.
advertisement
4/9
द हॉलीवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत हंसल मेहता यांनी सांगितलं की, प्रलय फिल्मची स्टोरी जय आणि विशाल कपूर यांनी लिहिली आहे. ही मूळ कथा आहे, कोणत्याही पुस्तकावर आधारित नाही.
advertisement
5/9
हंसल मेहता यांनी सांगितलं की, "जय बऱ्याच काळापासून या कल्पनेवर काम करत होता. जेव्हा रणवीरने त्याचं काम पाहिले, तेव्हा त्याने स्वतः त्याच्याशी संपर्क साधला आणि जयने त्याला ही कल्पना सांगितली. रणवीरला ही संकल्पना खूप आवडली, त्याने यात गुंतवणूक केली आणि जयला त्याचं काल्पनिक जग तयार करण्यास मदत केली"
advertisement
6/9
रणवीरसोबत अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच तिच्या 'लोकाह' या चित्रपटाच्या यशानंतर ती चर्चेत आली आहे.
advertisement
7/9
या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहतांचा मुलगा जय मेहता करत आहेत, ज्याने 'स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी'चं सह-दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटाची निर्मिती हंसल मेहता यांच्या 'ट्रू स्टोरी फिल्म्स' आणि रणवीर सिंग यांच्या 'मा कसम फिल्म्स' या बॅनरखाली होत आहे.
advertisement
8/9
रिपोर्टनुसार फिल्मचं बजेट अंदाजे 300 कोटी रुपये आहे. या फिल्मचं शूटिंग 2026 च्या मध्यापासून सुरू होणार आहे. हा चित्रपट 2027 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
advertisement
9/9
फिल्मचे तपशील फार माहिती नाहीत. पण ही फिल्म झोम्बीवर आधारित असणार आहे. यात झोम्बींनी भरलेल्या एका डिस्टोपियन शहरावर आधारित एक भयानक आणि उजाड जग चित्रित केले आहे. जिथं झोम्बींचा सुळसुळाट झाला आहे आणि मानव अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'धुरंधर' पेक्षाही 'खतरनाक अवतार'! रणवीर सिंगची नवीन फिल्म, काय आहे स्टोरी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल