'करीब मत आओ, बर्बाद कर दूंगी', फिल्मनंतर खरोखरच गायब झालीये Raaz ची भूतनी, 23 वर्ष पत्ता नाही, आहे कुठे?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'करीब मत आओ, बर्बाद कर दूंगी', म्हणत राझ या हॉरर सिनेमात प्रेक्षकांना घाबरवणारी भूतनी तुम्हाला आठवतेय का? फिल्मनंतर ती खरोखरच गायब झालीये. आता आहे कुठे? करते काय?
advertisement
1/8

23 वर्षांआधी आलेला राझ हा सिनेमा आठवतोय. या सिनेमाची एक वेगळीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये आजही आहे. 2002 मध्ये आलेल्या या हॉरर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. हा हॉरर सिनेमा त्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता.
advertisement
2/8
संपूर्ण सिनेमात एका पात्राने सगळ्यांना घाबरवलं ती म्हणजे राझमधील भूतनी. पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर ही भूतनी देखील गायब झाली. ती मागील 23 वर्षांपासून समोर आलेली नाही. ती कुठे आहे? काय करते?
advertisement
3/8
डिनो मोरिया आणि बिपाशा बसू यांच्या या सिनेमात प्रत्येकाला भूत म्हणून घाबरवणारी अभिनेत्री मालिनी शर्माचा हा पहिला आणि शेवटचा सिनेमा होता. यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर आल्या नाहीत असे नाही पण "राज" नंतर तिने एकही सिनेमा केला नाही.
advertisement
4/8
तिने मॉडेलिंग करत तिच्या करिअरची सुरुवात केली होती. मॉडेलिंगनंतर मालिनीने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केलं. 'सावन में लग गई आग', 'क्या सूरत है', 'रानझर' आणि 'कितनी अकेली' सारख्या म्युझिक व्हिडिओमध्ये तिनं काम केलं.
advertisement
5/8
मालिनीचं वैयक्तिक जीवन दुःखाने भरलेलं होतं. तिने 1997 मध्ये मॉडेल-अभिनेता प्रियांशु चॅटर्जीशी लग्न केलं. 2001 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला ज्यामुळे ती निराश झाली.
advertisement
6/8
घटस्फोटानंतर, मालिनी शर्माने तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'राझ' केला. या सिनेमानं तिला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली.
advertisement
7/8
महेश भट्ट यांनी मालिनीला त्यांच्या 'एनकाउंटर: द किलिंग' या सिनेमात भूमिका करण्याची ऑफर दिली आणि तिने होकार दिला. पण सेटवर आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच तिने नकार दिला.
advertisement
8/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने महेश भट्ट यांना केवळ मॉडेलिंगवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे सांगून हा प्रोजेक्ट सोडला. असंही म्हटलं जातं की तिने दिनो मोरियाचा 'गुनाह' हा सिनेमाही नाकारला. सध्या ती केवळ एक यशस्वी मॉडेल म्हणून ओळखली जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'करीब मत आओ, बर्बाद कर दूंगी', फिल्मनंतर खरोखरच गायब झालीये Raaz ची भूतनी, 23 वर्ष पत्ता नाही, आहे कुठे?