TRENDING:

Bigg Boss च्या घरातील 2 जिगरी दोस्तांची मैत्री तुटली; एकमेकांना केलं अनफॉलो, कोण आहेत ते?

Last Updated:
Bigg Boss 19 : बिग बॉस मराठी सुरू असताना आता बिग बॉस हिंदीच्या 19 व्या सीझनमधील दोन मित्र चर्चेत आले आहेत. त्यांची मैत्री तुटल्याचं सांगितलं जातं आहे.
advertisement
1/5
Bigg Bossमधील 2 जिगरी दोस्तांची मैत्री तुटली; एकमेकांना केलं अनफॉलो, कोण आहेत ते
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन चांगलाच गाजतो आहे. याच दरम्यान चर्चेत आला आहे तो बिग बॉस हिंदीचा स्पर्धक. बिग बॉस हिंदीच्या 19 व्या सीझनमधील हा स्पर्धक प्रणित मोरे, जो एक मराठी स्टँडअप कॉमेडिअन आहे.
advertisement
2/5
'बिग बॉस हिंदी'चा 19 वा सीझन काही दिवसांपूर्वीच संपला. गौरव खन्नाने 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली. गौरव आणि प्रणितची मैत्री प्रेक्षकांना भावली. पण प्रणितची आणखी एका सदस्यासोबत चांगली मैत्री झाली होती. जी आता तुटल्याची चर्चा आहे. कारण दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे.
advertisement
3/5
प्रणित मोरेचा हा मित्र दुसरा तिसरा कुणी नाही तर अभिषेक बजाज आहे. बिग बॉसच्या घरात त्यांची मैत्री सर्वांनी पाहिली होती. बिग बॉस संपल्यानंतर झालेल्या पार्टीत दोघंही एकत्र दिसले होते. पण बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर प्रणितचा पहिला स्टॅण्डअप शो झाला. ज्याला गौरव खन्ना, निहाल चुडासमा, बसीर अली यांनी हजेरी लावली होती पण अभिषेक मात्र आला नाही.
advertisement
4/5
आता दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांची मैत्री तुटल्याच्या चर्चा होत आहेत. या दोघांमध्ये नक्की असं काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर यामागील कारण बिग बॉस19 च असल्याचं सांगितलं जातं आहे.
advertisement
5/5
शोमध्ये एका एपिसोडमध्ये प्रणितला स्पेशल पॉवर मिळाली होती. घरातील एका सदस्याला एलिमिनेशनपासून वाचवण्याची संधी त्याला देण्यात आली होती. शोमध्ये कोणी सर्वात जास्त योगदान दिलं आहे त्याला वाचव असं सलमान म्हणाला होता. सलमानने त्याला हा निर्णय विचारपूर्वक घ्यायला सांगितला. तेव्हा प्रणितने अभिषेकला न वाचवता अशनूरचं नाव घेतलं होतं. त्याचवेळी त्यांच्या मैत्रीत फूट पडली होती. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss च्या घरातील 2 जिगरी दोस्तांची मैत्री तुटली; एकमेकांना केलं अनफॉलो, कोण आहेत ते?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल