विशालला मिस करते पण...! Bigg Boss Marathi 6 मधून बाहेर पडताच रुचिता करतेय नव्या आयुष्याची सुरुवात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Ruchita Jamdar : बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिता जामदारने आपलं मन मोकळं केलं आहे. ती नव्या आयुष्याला सुरुवात करत असल्याचं तिने सांगितलं आहे.
advertisement
1/7

गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर पडणारी सदस्य रुचिता जामदार. तिचं बिग बॉसमधून आऊट होणं सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं. रुचितालाही शॉक बसला होता. रडत रडत तिने बिग बॉसच्या घरातून निरोप घेतला. आता तिने आपण नव्या आयुष्याला सुरुवात करत असल्याचं सांगितलं आहे.
advertisement
2/7
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर दिलेल्या मुलाखतीत रुचिता म्हणाली, "मी घरातून बाहेर आले, पण अजूनही धक्क्यात आहे. नवीन आयुष्यासाठी सुरुवात चालू आहे"
advertisement
3/7
बिग बॉसच्या घरातील अनुभवाबाबत सांगताना रुचिता म्हणाली, आयुष्यातील एकमेव संधी होती. अपेक्षित होतं त्यापेक्षा खूप जास्त प्रेम मिळालं मला. खूप भारी वाटलं. इतके दिग्गज कलाकार त्यांच्यासोबत प्लॅटफॉर्म शेअर करताना, राहताना, भिडताना, भांडताना खूप मजा आली. खरंच खूप मोठी संधी होती. खरंच मी खूप आनंदी आहे.
advertisement
4/7
टॉप 5 कंटेस्टंट कोण असणार यावर रुचिता म्हणाली, "टॉप 5 मध्ये मी स्वत:ला मोजत होते पण आता मी घराबाहेर आहे" यानंतर तिने तन्वी, राकेश, अनुश्री, विशाल आणि प्राजक्ता यांची नावं घेतली आहेत. विशाल खचला नाही तर तो टॉप 5 मध्ये असेल असं ती म्हणाली.
advertisement
5/7
कुणाला मिस करते, असं विचारल्यावर तिने विशालचं नाव घेतलं. बिग बॉसच्या घरातील सगळ्यात बेस्ट क्षण कोणता असं विचारल्यावर ती म्हणाली, "भाऊच्या धक्क्यावर मी लावणी केली, इतकी वर्षे जी कला मी शिकते, ती इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सादर करायची संधी मिळाली, तो माझ्यासाठी बेस्ट क्षण होता"
advertisement
6/7
शेवटी तिने तिला प्रेम देणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. "मला पसंत करणं खरंच अवघड आहे आणि मी तुम्हाला पसंत आहे, मी तुम्हाला जशी आहे तसे आवडते, यासाठी खरंच खूप थँँक्यू"
advertisement
7/7
"ज्या काही चुका झाल्यात त्या मला मान्य आहेत. मी आयुष्यात अशीच पुढे जात राहिन. तुमची छोटी लाडकी रुचिता जी एक फायर गर्ल म्हणून ओळखली जाते, तुम्ही मला तशी उपमा देते, मला असाच पाठिंबा द्या", असं ती म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
विशालला मिस करते पण...! Bigg Boss Marathi 6 मधून बाहेर पडताच रुचिता करतेय नव्या आयुष्याची सुरुवात